राज्यात पुन्हा पुढील पाच दिवस अवकाळी पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवलाय. मध्य maharashtra आणि मराठवाड्यात पुढील पाच दिवस विजांच्या कडकडाटासह काही ठिकाणी पुन्हा गारपिटीची शक्यता वर्तवण्यात येत आहे. विदर्भात काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. 13 आणि 15 एप्रिलला काही ठिकाणी गारपिटीची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.