• Wed. Apr 30th, 2025

जागतिक आरोग्य दिनानिमित्त अवयवदान जनजागृती अभियान रॅली जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, लातूर स्थलांतरीत केंद्राचे उदघाटन

Byjantaadmin

Apr 8, 2023

जागतिक आरोग्य दिनानिमित्त अवयवदान जनजागृती अभियान रॅली जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, लातूर स्थलांतरीत केंद्राचे उदघाटन

▪️रेटीनोपॅथी ऑफ प्रिमॅच्युरिटी या उपक्रमाचे उदघाटन

▪️दिव्यांग व्यक्तींना कृत्रिम साधनांचे वितरण,

लातूट  ( जिमाका ) जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून आज स्वामी विवेकानंद रुग्णालय आणि संवेदना प्रकल्प हरंगूळ यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या स्थलांतरित इमारतीचे उद्‌घाटन करण्यात आले. या कार्यक्रमात दिव्यांगांना साधन साहित्याचे वाटपही करण्यात आले. सकाळी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या वतीने अवयवदान जनजागृती अभियानाच्या निमित्ताने रॅली काढण्यात आली. या रॅलीचा शुभारंभ खा. सुधाकर श्रृंगारे आणि माजी मंत्री आ. संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आला.

सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये झालेल्या मुख्य कार्यक्रमास  पदमश्री डॉ. अशोक काका कुकडे, जिल्हाधिकारी  पृथ्वीराज बी. पी,  जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल,अधिष्ठाता डॉ. श्री. समीर जोशी, संवेदना प्रकल्पाचे सुरेश दादा पाटील, उपअधिष्ठाता डॉ. श्री. अजित नागावकर, डॉ. उमेश लाड, डॉ. गंगाधर अनमोड, डॉ. अजय ओव्हाळ, डॉ.उदय मोहिते, डॉ.  शैलेंद्र चव्हाण, डॉ.महादेव बनसोडे, डॉ. नीलिमा देशपांडे, श्री. बसवराज पैके यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

महाराष्ट्र शासनाने वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाअंतर्गत रुग्णसेवेसाठी व विविध रोगांच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी विविध अभियान सुरु केले आहेत. त्यामध्ये जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधुन दि.07 एप्रिल,2023 पासून अवयवदान जनजागृती हे राज्यस्तरीय अभियान
वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन  यांच्या संकल्पनेतून हाती घेण्यात आलेले आहे.

त्याअनुषंगाने या महाविद्यालयात अवयवदान जनजागृती अभियाना करिता विविध शासकीय, निमशासकीय कार्यालयामध्ये जनजागृती करण्यासाठी ८ पथकांची नेमणूक करण्यात आली आहे.

जनजागृती रॅलीमध्ये संस्थेतील  डॉ. सचिन जाधव वैद्यकीय अधिक्षक, डॉ. गंगाधर अनमोड प्राध्यापक शल्यचिकित्साशास्त्र, डॉ. शैलेंद्र चौहाण,  बधिरीकरणशास्त्र विभाग, डॉ. अजय ओव्हाळ प्राध्यापक त्वचा व गुप्तरोग विभाग, डॉ. बालाजी कोंबडे प्राध्यापक क्ष-किरण विभाग, डॉ. शिवप्रसाद मुंदडा विभागप्रमुख बालरोग विभाग, डॉ. अजित नागांवकर विभागप्रमुख जनऔषधवैद्यकशास्त्र विभाग व  विविध विभागाचे प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, अवयवदान जनजागृती रॅलीचे संयोजक डॉ. दिपक कोकणे ,  इतर अधिकारी व कर्मचारी,  तसेच मोठया संख्येने पदवीपूर्व विद्यार्थी, पदव्युत्तर विद्यार्थी,  परिचर्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. या रॅलीचा प्रारंभ महाविद्यालयाच्या इमारतीपासून  सुरु होऊन मिनी मार्केट ते गांधी चौक, गांधी चौक ते अतिविशेषोपचार रुग्णालय येथे समारोप करण्यात आला.

*माजी मंत्री आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांचा अवयव दान संकल्प*

यावेळी अवयव दान जनजागृतीपर कार्यक्रम करण्यात आला. त्यावेळी आ. संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी आणि इतर मान्यवरांनी अवयवदान करण्याचा निर्धार केला असुन त्यांनी स्वत: संमतीपत्र भरुन अधिष्ठाता यांच्याकडे सुपूर्द केले व नागरिकांनी अवयवदानासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहनही यावेळी केले.
विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, लातूर व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र लातुर यांच्या संयुक्त विद्यमाने आज रेटीनोपॅथी ऑफ प्रिमॅच्युरिटी या उपक्रमाचे उदघाटन, दिव्यांग व्यक्तींना कृत्रिम साधनांचे वितरण  व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, लातुर स्थलांतरीत  केंद्राचे उदघाटन पदमभुषण डॉ. अशोकराव कुकडे यांच्या अध्यक्ष्यतेखाली करण्यात
आले. या वेळी  खा. सुधाकर शृंगारे, माजी मंत्री आ.  संभाजीराव पाटील निलंगेकर, जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी.,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल,विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. समीर जोशी , डॉ श्री. सुरेश पाटील कार्यवाही संवेदना प्रकल्प,  डॉ. राजेश पाटील अध्यक्ष संवेदना प्रकल्प, श्री. अनिल अंधोरीकर अध्यक्ष, विवेकानंद वैद्यकीय प्रतिष्ठातन, व संस्थेतील अधिकारी, व कर्मचारी मोठया संखेने उपस्थित होते.
सदर कार्यक्रमामध्ये जिल्हा दिव्यांग केंद्रामध्ये उपलब्ध असलेल्या सोयी-सुविधांची माहिती देण्यात आली व जिल्हयातील सर्व दिव्यांग व्यक्तींनी जिल्हा दिव्यांग केंद्रामध्ये दिव्यांगाना मोफत कृत्रिम अवयवांचे व उपकरणांचे  मोफत वाटप करण्यात येत असुन त्याचा लाभ घेण्यात यावा असे आवाहन सर्व मान्यवरांनी केले.

या संस्थेच्या रुग्णालयामध्ये  जन्मजात कर्णबधिर व कर्णबधिर झालेल्या रुग्णांची श्रवणशक्ती परत आणण्यासाठी COCHLEAR  IMPLANT ही शस्त्रक्रिया विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये येणार असून जिल्हयातील सर्व  जन्मजात कर्णबधिर व कर्णबधिर झालेल्या रुग्णांनी या शस्त्रक्रियांचा लाभ घ्यावा असे आवाहन असे डॉ. समीर जोशी अधिष्ठाता, विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय लातुर यांनी यावेळी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *