• Wed. Apr 30th, 2025

‘हायकमांड’ निष्ठावानास ‘कष्टाचं फळ’ देतील; मुख्यमंत्रीपदावरून शिवकुमारांचं सूचक वक्तव्य

Byjantaadmin

Apr 6, 2023

कर्नाटक राज्य काँग्रेसमध्ये कोणत्याही प्रकारची अंतर्गत गटबाजी नाही. विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसला चांगले यश मिळेल. तसेच मुख्यमंत्रीपदावरून पक्षात कोणताही वाद नाही. हे भाजपचे कारस्थान आहे. पक्षाने प्रामाणिक कार्यकर्त्यांना नेहमीच प्रोत्साहन देण्याचे काम केले आहे. राज्यात काँग्रेसला बहुमत मिळाले तर ‘हायकमांड’ निष्ठावानास त्याच्या कष्टाचे फळ देतील, असे कर्नाटक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी मुख्यमंत्रीपदावरून सूचक वक्तव्य केले आहे.

ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री हे मुख्यमंत्री पदाचे दावेदार मानले जातात. मुख्यमंत्रीपदावरून सिद्धरमय्या आणि शिवकुमार असे दोन गट असल्याचे शिवकुमार यांनी यावेळी नाकारले. शिवकुमार म्हणाले, “आम्ही दोघेही एकत्र काम करत आहोत. भाजप असे मुद्द्यांवर आफवा पसरवून पक्षात फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे. आमच्यात कोणत्याही प्रकारची गटबाजी नाही. भाजपला पराभूत करणे आणि कर्नाटकचे वैभव परत आणणे हेच आमचे ध्येय आहे.”

यावेळी d k shivkumar यांनी काँग्रेसला १४० जागा मिळण्याचा विश्वास व्यक्त केला.ते म्हणाले, “आमच्यामध्ये १७५ विधानसभेच्या जागांवर एकमत झाले आहे. त्यातील सुमारे १४० जागा आम्हाला मिळतील असा विश्वास आहे. काँग्रेसला बहुमत मिळाले तर मुख्यमंत्रीपदासाठी पक्षाच्या ‘हायकमांड’ निर्णय घेतील. आतापर्यंत ‘हायकमांड’ने प्रामाणिक, निष्ठावान आणि पक्षासाठी झिजणाऱ्या कार्यकर्त्यांची कधीच उपेक्षा केलेली नाही. त्यानुसार कर्नाटकमध्येही ते निर्णय घेतील आणि संबंधितास कष्टाचे फळ देतील, यात काही शंका नाही.”

यावेळी मुख्यमंत्री होण्याच्या इच्छेबाबत शिवकुमार म्हणाले, “मी पक्षाचा निष्ठावान कार्यकर्ता आहे. पक्षाशी कधीही गद्दारी केली नाही. कर्नाटक जिंकू आणि मग निर्णय पक्षाच्या हायकमांडवर सोडू. ज्यांनी पक्षाला पाठिंबा दिला त्यांना हायकमांडने नेहमीच पाठिंबा दिला आहे. माझा त्यांच्यावर विश्वास आहे. तसेच माझा माझ्या नेतृत्व कौशल्यावरही विश्वास आहे. राज्यात congress कमकुवत असताना मी पक्षाची सूत्रे हाती घेतली. पक्ष वाढीसाठी दिवसरात्र अथक परिश्रम घेतले. सर्वांना बरोबर घेऊन राज्याच्या कानाकोपऱ्यात पक्ष पोहचवला आहे.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed