• Tue. Apr 29th, 2025

Check PNR And Train Live Status : आता WhatsApp वर मिळवा ट्रेनचे लाइव्ह स्टेटस

Byjantaadmin

Apr 3, 2023

आजकाल, बहुतेक युजर्स त्यांची सर्व कामं इन्स्टंट मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपवर करतात. मग ते व्हॉइस कॉलिंग असो चॅटिंग असो किंवा पेमेंट. पण जर तुम्हाला या मेसेजिंग अॅपद्वारे फोनवरच PNR आणि थेट ट्रेनची माहिती मिळवता आली तर ? होय, व्हॉट्सअॅपने आपल्या युजर्सच्या सोयीसाठी नवे फीचर्स आणले आहेत. यापैकी एक म्हणजे IRCTC ची प्रत्येक माहिती तुम्ही व्हॉट्सअॅपवर मिळवू शकता .

यूजर्स व्हॉट्सअॅपवर IRCTC च्या Railofy Chatbot सेवेवरून सर्व माहिती मिळवू शकतात. मी WhatsApp द्वारे PNR आणि थेट ट्रेन स्टेटस कसा चेक करायचा याची माहिती घेऊ. तर तुम्ही WhatsApp वर PNR आणि ट्रेन स्टेटस सहज तपासू शकता. IRCTC च्या Railofy AI चॅटबॉटद्वारे, तुम्ही थेट ट्रेनची स्थिती पाहू शकता, ज्यामध्ये तुम्ही तुमच्या WhatsApp वर एका स्टेशनच्या आधी किंवा पुढील येणाऱ्या स्टेशनची माहिती मिळवू शकता. यासाठी तुमचा 10 अंकी फोन नंबर सेव्ह करू शकता आणि तो IRCTC च्या AI चॅटबॉटवर पाठवू शकता.

जर तुम्हाला पीएनआर तपासायचा असेल आणि व्हॉट्सअॅपवर लाइव्ह स्टेटस बघायचा असेल, तर त्यासाठी तुम्ही आधी व्हॉट्सअॅपवर रेलॉफी एआय चॅटबॉट इंस्टॉल केलं पाहिजे. यासाठी तुमच्या फोनमध्ये IRCTC ने दिलेला +919881193322 नंबर सेव्ह करा. नंबर सेव्ह केल्यानंतर तुम्ही व्हॉट्सअॅपच्या सेटिंगमध्ये हा नंबर सर्च करा. आता इथे तुम्ही AI चॅटबॉटशी कनेक्ट व्हाल.

इथे तुम्ही पीएनआर नंबर टाका आणि ट्रेनचा स्टेटस चेक करा. याशिवाय जर तुम्हाला खाद्यपदार्थ ऑर्डर करायचे असतील तर तुम्ही IRCTC अॅप Zoop वरून फूड ऑर्डर करू शकता. म्हणजेच आता तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही किंवा तुम्हाला ट्रेनमधून उतरून स्टेशनवर जाण्याची गरज नाही, तुम्ही ट्रेनमध्ये बसून जेवण ऑर्डर करू शकता आणि खाऊ शकता.

हे एआय चॅटबॉट कसं वापरायचं?

यासाठी +91-9881193322 हा नंबर फोनमध्ये सेव्ह करा.

WhatsApp वर Railofy चॅट उघडा.

यानंतर 10 अंकी पीएनआर नंबर टाका आणि व्हॉट्सअॅपवरील चॅटबॉटवर मेसेज पाठवा.

यानंतर, येथे तुम्हाला रेल्वे चॅटबॉट Railofy वर ट्रेनचे लाइव्ह अपडेट्स मिळतील

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed