• Thu. May 1st, 2025

शिवसेना आणि मशालीचं जुनं नातं

Byjantaadmin

Oct 10, 2022

मुंबई : शिवसेनेचा वाद केंद्रीय निवडणूक आयोगात पोहोचला होता. अंधेरी पोटनिवडणुकीच्या पूर्वी शिंदे गटानं आयोगानं चिन्हाबाबत तातडीनं निर्णय घ्यावा, अशी मागणी केली होती. निवडणूक आयोगानं दोन्ही गटांकडून कागदपत्र सादर करण्यात आल्यानंतर शिवसेना आणि धनुष्यबाण हे मुळ चिन्ह गोठवण्याचा निर्णय घेतला. केंद्रीय निवडणूक आयोगानं दोन्ही गटांना नवी नावं आणि चिन्ह सादर करण्यास सांगितलं होतं. उद्धव ठाकरे यांच्या गटानं शिवसेना बाळासाहेब ठाकरे, शिवसेना बाळासाहेब प्रबोधनकार ठाकरे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ही तीन नावं दिली होती. तर चिन्ह म्हणून त्रिशुळ, उगवता सूर्य आणि मशाल हे चिन्ह आयोगाला दिलं होतं. केंद्रीय निवडणूक आयोगान उद्धव ठाकरेंना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव दिलं आणि मशाल चिन्ह देण्यात आलं आहे.

शिवसेना आणि मशालीचं जुनं नातं

शिवसेना पूर्वी नोंदणीकृत पक्ष नव्हता. त्यामुळं शिवसेनेला १९८९ मध्ये धनुष्यबाण चिन्ह मिळालं होतं. त्यापूर्वी शिवसेनेच्या उमेदवारांची नोंद अपक्ष म्हणून व्हायची. १९८५ साली छगन भुजबळ हे मशाल चिन्हावर विधानसभेत विजयी झाले होते.तर, औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील सेनेचा पहिला खासदार देखील मशाल चिन्हावर निवडून आला होता, असं चंद्रकांत खैररे यांनी सांगितलं. शिवसेनेनं यापूर्वी ढाल तलवार, रेल्वे इंजिन, उगवता सूर्य, या विविध चिन्हांचा वापर केला होता.दरम्यान, केंद्रीय निवडणूक आयोगानं एकनाथ शिंदे यांच्या गटाला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव दिलं आहे. तर, त्यांनी दिलेली त्रिशुळ, उगवता सूर्य आणि गदा हे चिन्ह नाकारलं आहे

मशाल चिन्ह तिसरा पसंतीक्रम
उद्धव ठाकरे यांच्याकडून तीन चिन्ह देण्यात आली होती. त्यामध्ये त्रिशुळ, उगवता सूर्य आणि मशाल ही चिन्ह देण्यात आली होती. ठाकरे गटानं दिलेल्या तिसऱ्या स्थानावर असलेलं चिन्ह उद्धव ठाकरेंना मिळालं. मशाल हे चिन्ह यापूर्वी एका राजकीय पक्षाकडे होतं मात्र त्या पक्षाचा जनाधार कमी झाल्यानं ते चिन्ह खुलं झालं होतं. ते आता उद्धव ठाकरे यांना मिळालं होतं.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *