आ. अभिमन्यू पवार यांचा पाठपुरावा ; औसा मतदारसंघातील तांडा वस्त्यां विकासासाठी २ कोटींचा निधी मंजूर
औसा – आमदार अभिमन्यू पवार यांच्या मागणीवरून औसा विधानसभा मतदारसंघातील २१ तांडा/वस्त्यांवर प्राथमिक सुविधा विकसित करण्यासाठी इतर मागास बहुजन कल्याण विभागाने वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजनेअंतर्गत २ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.याचबरोबर आ. अभिमन्यू पवार यांच्या पाठपुराव्यामुळे मतदारसंघातील अनेक तांड्यांना व वस्त्यांना जोडणाऱ्या रस्त्यांचे कामे करण्यासाठी सुद्धा कोट्यवधींचा निधी लवकरच उपलब्ध होणार आहे.
या निधीतून मदनसुरी येथील वडार वस्ती सभागृह बांधकाम १० लक्ष, एरंडी वडार वस्ती सभागृह १० लक्ष, तावशीताड वडार वस्ती सभागृह १० लक्ष, लामजना वडार वस्ती सभागृह व संरक्षण भिंत १० लक्ष, मंगरूळ वडार वस्ती क्रमांक १ अंतर्गत रस्ता १० लक्ष, मातोळा वडार वस्ती सभागृह व संरक्षण भिंत १० लक्ष, उंबडगा खुर्द वडार वस्ती अंतर्गत रस्ता ८ लक्ष, येळी /देवंग्रा वडार वस्ती सभागृह बांधकाम ८ लक्ष, ताबंरवाडी वडार वस्ती अंतर्गत रस्ता ८ लक्ष, दापेगाव अहिल्यादेवी नगर सभागृह बांधकाम १५ लक्ष, किल्लारी वडार वस्ती अंतर्गत रस्ते ८ लक्ष, कलमुंगळी धनगर वस्ती रस्ता ८ लक्ष, कोकळगाव कांबले वस्ती रस्ता ८ लक्ष, माळेगाव (क) धनगर वस्ती क्रमांक सभागृह बांधकाम ८ लक्ष, आशीव धनगर वस्ती क्रमांक १ संरक्षण भिंत बांधणी १० लक्ष, कोराळी मरगीवाडी रस्ता १० लक्ष, गुबाळ धनगर वस्ती क्रमांक १ रस्ता ९ लक्ष, चांदुरी धनगर वस्ती सभागृह १० लक्ष, चिंचोंली (स) धनगर वस्ती क्रमांक १ सभागृह बांधकाम १० लक्ष, चिलवंतवाडी वडार वस्ती सभागृह बांधकाम १० लक्ष, देवी हल्लाळी वडार वस्ती सभागृह बांधकाम १० लक्ष रुपये असे एकूण २ कोटींचा निधी सदरील कामासाठी मंजूर करण्यात आला आहे.
औसा मतदारसंघातील विकास कामांसाठी हा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आमदार अभिमन्यू पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे व लातूरचे पालकमंत्री गिरीश महाजन यांचे आभार मानले आहेत.
………….
स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतरही बहुतांश तांडे, वस्त्या या विकासापासून वंचित राहिल्या आहेत. विकासापासून आजवर वंचित राहिलेल्या भागाला प्राधान्य देण्याची भूमिका असून अनेक तांड्यांना, वस्त्यांना जोडणाऱ्या रस्ते काम करण्यासाठी सुद्धा कोट्यवधींचा निधी लवकरच उपलब्ध होणार आहे. विकासाचे जे स्वप्न जनतेला दाखवून २०१९ मध्ये जनादेश प्राप्त केला आहे, ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण प्रामाणिक प्रयत्न करीत असल्याचा विश्वास यानिमित्ताने मतदारसंघातील जनतेला देत असल्याचे आ. अभिमन्यू पवार यांनी सांगितले.