लातूर महानगरपालिके कडून प्लास्टिक बंदी मोहीम अंतर्गत मोठ्या प्रमाणात प्लास्टिक जप्त व दंड वसूल.
केले कापडी पिशव्यांचे वापर करण्याचे आवाहन.
लातूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा लातूर महानगरपालिका आयुक्त पृथ्वीराज बी.पी यांच्या आदेशानुसार लातूर शहर नगर प्रशासन विभागाचे सह आयुक्त श्री रामदास कोकरे, उपायुक्त लातूर महानगरपालिका वीणा पवार ,स्वच्छता विभाग प्रमुख श्री रमाकांत पिडगे यांच्या नेतृत्वाखाली आज प्लास्टिक बंदी अधिनियम नुसार प्लास्टिक बंदी उपक्रमांतर्गत मोठ्या प्रमाणात मंडई परिसर, दयानंद कॉलेज परिसर,संविधान चौक परिसर या ठिकाणचे, विविध बेकरी दुग्ध व्यवसायिक, फेरीवाले ,फळ विक्रेते, बुके विक्रेते, तिच्यावर प्लास्टिक वापराबाबत कारवाई करण्यात आली. काही नागरिकांवर जे कॅरीबॅगचा वापर करत होते त्यांच्यावरही कारवाई करण्यात आली. प्लास्टिक लावलेले बुके, प्लास्टिकच्या पिशव्या ,पोलिवोवन पिशव्या या जप्त करण्यात आलेले आहे व संबंधित प्लास्टिक वापरणाऱ्यांवर दंड करण्यात आलेला आहे.
नागरिकांनी तसेच व्यापाऱ्यांनी प्लास्टिकच्या पिशव्या न वापरता कापडी पिशव्या वापरण्याच्या आहेत असे आवाहन लातूर महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आलेले आहेत. ही कारवाई अशीच चालू राहणार आहे व दहा दिवसात पूर्ण शहर प्लास्टिक मुक्त करणे कामी प्रयत्न सुरू आहे.
दिनांक १०/१०/२०२२ रोजी रयतु बाजार ते संविधान चौक येथे प्रत्यक्ष तपासणी कारवाईत १० किलो कॅरीबॅग जप्त करण्यात आली तसेच सार्वजनिक रस्त्यावर कचरा टाकणारे नागरिकांकडून असा एकूण मोहिमेत दंडात्मक रक्कम १९०००/- रुपये.वसुल करण्यात आला,या मोहिमेत अतिक्रमण विभाग प्रमुख रवि काबंळे, स्वच्छता निरीक्षक प्रल्हाद शिंदे, महादेव फिस्के,स्वंयप्रकाश वैरागे,शिवाजी कुटकर, गजानन सुपेकर , रवि शेंडगे, व बलाजी राऊत , इसुब शेख , रंजीत गायवाड,गणी सय्यद,मनोज कसबे, आनंद पडसाळे इ. कर्मचारी उपस्थित होते