राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नवी मुंंबईतील डी. वाय. पाटील विद्यापीठाने डॉक्टरेद पदवी प्रदान केली आहे. यावरुन संजय राऊत यांनी डॉक्टर झालेल्या एकनाथ शिंदेंना जोरदार टोला लगावला आहे.
असे लोक पायलीला पन्नास
आज पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले, प्रत्येक भ्रष्टाचाऱ्याला डॉक्टरेट मिळवतात येते. अशा पद्धतीने भ्रष्टाचाऱ्यांना डॉक्टरे देणाऱ्या विद्यापीठांचीच चौकशी व्हायला पाहीजे. अशा पद्धतीने डॉक्टरेट मिळवणारे लोक पायलीला पन्नास मिळतील. एकनाथ शिंदेंना डॉक्टरेट देणाऱ्या विद्यापीठाची अशी कोणती काम अडकली होती? अशा कोणत्या फायली अडकल्या होत्या त्यामुळे त्यांना असे काम करावे लागले.
आम्हाला मुका मार देता येतो
संजय राऊत म्हणाले, एकनाथ शिंदे आता डॉक्टर झाले आहेत. त्या डॉक्टरांना जाऊन विचारा की वीर सावरकर कोणत्या बोटेतून उडी मारून कोणत्या बेटावर गेले? आम्हाला चांगला मुका मार देता येतो. आता तुम्ही डॉक्टर झाले आहात तर स्वत:वर ऑपरेशन करत रहा.
भ्रष्ट मार्गाने निवडणूक जिंकली
भाजपवर टीका करताना संजय राऊत म्हणाले, भाजप विरोधकांचा आवाज दाबत आहे. विरोधकांच्या आंदोलनालाही भाजपकडून आडकाठी घातली जात आहे. या देशातील जनता आता भाजपविरोधात रस्त्यावर उतरत आहे. याचाच अर्थ जनतेच्या मनात भाजपविरोधात रोष आहे. या लोकांनी भाजपला मतदान केलेले नाही. भाजपने भ्रष्ट मार्गाने निवडणूक जिंकलेली आहे. शरद पवारांनी ईव्हीएमचा मुद्दा पुढे आणला आहे. या विषयावर पुढे जाण्याची गरज आहे.
देशात बदल्याचे राजकारण
संजय राऊत म्हणाले, देशात सध्या बदल्याचे राजकारण सुरू आहे. भाजप विरोधकांविरोधात सुडाचे राजकारण करत आहे. मात्र, भाजप अदानीच्या मागे का उभे आहे? भाजप अदानीला वाचवण्याचा प्रयत्न का करत आहे? दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी काल विधानसभेत भाषण केले. यात केजरीवाल म्हणाले, चेहरा केवळ अदानीचा आहे. मात्र, अदानीकडे भाजपचाच पैसा आहे. नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री झाल्यानंतरच अदानींचा उदय झाला आहे. तेच मोदी आईजद सर्व विषयांवर बोलतात. मात्र, अदानींचा विषय टाळत आहेत. उद्योगपती अदानीने देश लुटला आहे. अदानीच्या खात्यात 20 हजार कोटी रुपये कुठून आले, असा सवाल राहुल गांधी करत आहेत. त्याचे उत्तर आधी नरेंद्र मोदींनी द्यायला हवे.