काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोमवारी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. LIC, SBI व EPFO चे भांडवल अदानी समूहात गुंतवले जात आहे. या प्रकरणी कोणतेही उत्तरदायित्व नाही किंवा तपासही केला जात नाही. अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एवढी भीती का वाटत आहे? असे राहुल म्हणाले.
काय म्हणाले राहुल?
राहुल गांधी यांनी सोमवारी एका इंग्रजी वृत्तपत्रात प्रकाशित बातमीचा दाखला देत केंद्रावर हल्ला चढवला. या वृत्तात ईपीएफओच्या सब्सक्रायबर्सही अदानींच्या 2 शेअर्सचे ‘कॅप्टिव्ह गुंतवणूकदार’ असल्याचा दावा करण्यात आला आहे. राहुल यासंबंधीच्या ट्विटमध्ये म्हणाले – जनतेच्या रिटायरमेंटच्या पैशांची अदानींच्या कंपन्यात का गुंतवणूक का केली जात आहे? मोदीनीच्या खुलाशानंतरही हे का सुरू आहे. पंतप्रधानजी ना तपास, ना उत्तर. अखेरीस एवढी भीती कशाची वाटत आहे?

ते म्हणाले – LIC चे भांडवल अदानींना! SBI चे भांडवल अदानींना! EPFO चे भांडवलही अदानींनाच, असेही ते या ट्विटमध्ये म्हणाले.
अदानींच्या या कंपन्यांत गुंतवणूक
यासंबंधीच्या वृत्तानुसार, EPFO ची बहुतांश गुंतवणूक निफ्टी 50 शेअर्समध्ये केली जाते. त्यात अदानी एंटरप्रायझेस व अदानी पोर्ट्स अँड SEZ चा समावेश आहे. हिंडेनबर्गचा अहवाल आल्यानंतर अदानींचे हे दोन्ही शेअर्स कोसळलेत.

राहुल यांची तिखट टीका
उल्लेखनीय बाब म्हणजे खासदारकी रद्द झाल्यानंतर राहुल गांधी व काँग्रेस नेते सातत्याने केंद्र व सत्ताधारी भाजपवर निशाणा साधत आहेत. राहुल गांनी यांनी परवाच पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उद्योगपती गौतम अदानींशी साटेलोटे असल्याचा आरोप केला होता. ते म्हणाले होते – ‘अदानींचा नरेंद्र मोदींशी कोणते नाते आहे? या लोकांची मला भीती वाटत नाही. माझे संसद सदस्यत्व रद्द करून, घाबरवून, धमकावून किंवा तुरुंगात पाठवून माझे तोंड बंद करता येईल असे त्यांना वाटत असेल तर ते चूक आहे. मी भारताच्या लोकशाहीसाठी संघर्ष करत असून, यापुढेही करत राहील.’
राहुल पुढे म्हणाले होते की, ‘मी संसदेत असेल किंवा बाहेर असेल याने काहीही फरक पडत नाही. मला माझी तपश्चर्या करायची आहे. मी ती करून दाखवेल. त्यांनी मारले किंवा तुरुंगात डांबले तरी मी माझा मार्ग सोडणार नाही. पंतप्रधानांना करण्यात आलेल्या प्रश्नापासून वाचण्यासाठी हे नाटक केले जात आहे. अदानींच्या शेल कंपन्यांत 20 हजार कोटींची गुंतवणूक कुणाची आहे? मी या धमक्यांना भीक घालत नाही. अपात्रता किंवा तुरुंगवासालाही घाबरत नाही.’