लातूर : [प्रतिनिधी]अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेते खासदार राहूल गांधी यांना सूरत न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली़ न्यायालयाच्या या निर्णयानंतर केंद्र सरकारच्या वतीने लोकसभा सचिवालयाकडून खासदार राहूल गांधी यांची खासदारकी तडकाफडकी रद्द करण्याचे आदेश देण्यात आले़. केंद्र सरकार संविधानविरोधी काम करीत असून लोकशाहीचा गळा घोटत असल्याचा आरोप करीत लातूर जिल्हा काँग्रेस व लातूर शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने शनिवार दि़ २५ मार्च २०२३ रोजी सकाळी येथील महात्मा गांधी चौक या ठिकाणी केंद्र सरकारच्या विरोधात स्वाक्षरी मोहीम राबवली़, दरम्यान यावेळी केंद्र सरकारच्या निषेधाच्या घोषणाहि देण्यात आल्या़. केंद्र सरकारच्या हुकुमशाही वृत्तीच्या निषेधार्थ भारतीय
राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने देशभर आंदोलन केले जात आहे़. त्याचाच एक भाग म्हणून लातूर जिल्हा काँग्रेस व लातूर शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने
शनिवारी लातूर शहरातील महात्मा गांधी चौक या ठिकाणी आंदोलन करण्यात आले़. या आंदोलनात केंद्र सरकारच्या हुकुमशाहीच्याविरोधात स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली़. लातूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्रीशैल उटगे व लातूर शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अॅड़ किरण जाधव यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात अॅड़ समद पटेल, अॅड़ फारुक शेख, सुभाष घोडके, रमेश सूर्यवंशी, सूर्यशीला मोरे, प्रा़. डॉ़. स्मिता खानापुरे, सपना किसवे, स्वाती जाधव, गोरोबा लोखंडे, अॅड़ देविदास बोरुळे-पाटील, कलीम शेख, मैनोद्दिन शेख, कैलास कांबळे, कमलताई शहापूरे, सुनंदा कांबळे, कमलबाई मिटकरी, लक्ष्मीबाई बटनपूरकर, सुलेखा कारेपूरकर, सायरा पठाण, शीला वाघमारे, उषा चिकटे, वर्षा मस्के, व्यंकटेश पुरी, सिकंदर पटेल, भाऊसाहेब भडीकर, डॉ़. बालाजी साळूंके, मनोज देशमुख, अभिजीत भिसे, ज्ञानोबा गवळे, नरेश पवार, जालिंदर बरडे, सोनू डगवाले,
ख्वॉजापाशा शेख, युनूस शेख, सचिन बंडापल्ले, शहाजी नरवडे, अमोल शेरे, सुवर्णा डांगे, रविकांत गायकवाड, सचिन राठोड, प्रविण जांभळे, बप्पा मार्डीकऱ, अशोक गोविंदपूरकर, अहेमदखा पठाण, अॅड़ एस़ एस़ इंगळे, तनुजा कांबळे, व्यंकट पांचाळ, नेहा ढगे, मुनीर सौदागर, शीतल मालाजी, सरस्वती लाहोटी, प्रविण सूर्यवंशी, डॉ़. अरविंद भातांब्रे, आयुब मनियार, किरण सोमवंशी, जयदेव मोहीते, अनिल चव्हाण, सुंदर पाटील कव्हेकर, शमीम कोतवाल, संजय ओहाळ, मेघराज शिंदे, महेश काळे, पिराजीसाठे, धनराज गायकवाड, जमालोद्दिन मणियार, सुमीत भडीकर, प्रविण राजे, धनंजय शेळके, राज क्षीरसागर, नितीन कांबळे, रत्नदीप अजनीकर, बिभीषणसांगवीकर, शोएब देशमुख, समाधान गायकवाड, अजित काळदाते, उदयसिंह देशमुख, विपूल हाके, हमीद बागवान, पप्पू देशमुख, लिंबराज पाटील, बालाजी मनदुमले, परमेश्वर समदरले, सुमीत खंडागळे, अभिषेक पतंगे, विजयकुमार साबदे, बालाजी झिपरे, विष्णुदास धायगुडे, अनिल जाधव यांच्यासह काँग्रेस पक्षाचे विविध सेलचे पदाधिकारी, सदस्य, नागरिक सहभागी झाले होते़.
केंद्र सरकारच्या विरोधात काँग्रेसची स्वाक्षरी मोहीम
