• Wed. Apr 30th, 2025

आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वात केलेल्या कामाने जिल्हा परिषदेने मिळवला देश पातळीवरील पुरस्कार

Byjantaadmin

Mar 25, 2023
आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वात केलेल्या कामाने जिल्हा परिषदेने मिळवला देश पातळीवरील पुरस्कार

 लातूर/प्रतिनिधी:आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या सूचनेनुसार तत्कालीन जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे, उपाध्यक्ष भारतभाई साळुंखे, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल,सर्व विषय समिती सभापती,जि.प.सदस्य, पं.स.सभापती व सदस्यांसह प्रशासकीय अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील जनतेला पुरविलेल्या आरोग्य सेवा-सुविधांची दखल राष्ट्रीय पातळीवर घेत लातूर जिल्हा परिषदेला मानांकन मिळाले.असा पुरस्कार पहिल्यांदाच मिळाल्याने आ.निलंगेकर यांचे सर्वत्र कौतूक होत आहे.
 शासनाच्या वतीने पुरविण्यात येणाऱ्या सर्व सेवा सुविधा लाभार्थ्यापर्यंत योग्य पद्धतीने पुरवल्यामुळे हा पुरस्कार मिळाला असून यातील आरोग्य केंद्राच्या माध्यमातून स्वस्थ भारत व आयुष्यमान भारत या गटातून जिल्हा प्रशासनाने पुरस्कारासाठी नामांकन सादर केले होते. देशभरातून अनेक जिल्ह्यांनी नामांकन सादर केले होते मात्र लातूरसह दोन जिल्ह्याना हा पुरस्कार नुकताच जाहीर झाला आहे.
 आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वाखाली व नियोजनाने तत्कालीन जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे,उपाध्यक्ष भारतभाई साळुंखे सर्व विषय समिती सभापती जिल्हा परिषद सदस्य मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव वेल यांनी कोरोना काळात केलेल्या अथक परिश्रमामुळे जिल्ह्यात आरोग्य सोयी सुविधा पुरवून उल्लेखनीय कार्य केले आहे.लातूर जिल्हा परिषदेच्या 251 आरोग्यवर्धिनी केंद्रातून गतकाळात अत्यंत चांगल्या प्रकारे आरोग्य सुविधा दिल्या गेल्या असून यात माता बाल संगोपनासह मधुमेह रक्तदाब कर्करोग अशा विविध आजारांसाठी तपासणी उपचाराला प्राधान्य देत महिलांतील कर्करोग निदान उपचारासाठी ही संजीवनी अभियानाही मोठ्या प्रमाणात यशस्वीपणे राबविण्यात जिल्हा परिषद लातूरला यश मिळाले.
आरोग्य सेवा साठी पायाभूत सर्वेक्षणातून माहिती संकलित करण्यात आली व यातून रुग्णांना दर्जेदार सेवा सुविधांचा लाभ मिळवून दिला आहे परिणामी केंद्राच्या कायाकल्प योजनेतून 65 केंद्रांना पुरस्कार मिळाला असून कायाकल्प नंतर आता पंतप्रधान पुरस्कारामुळे लातूर जिल्हा परिषदेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे.
 या मानांकनामुळे जिल्हा परिषदेने केलेल्या उपक्रमाचे केंद्र सरकारच्या फिल्म कौन्सिलच्या वतीने लघुपटासाठी संकलन करण्यासाठी केंद्राचे एक पथक लवकरच जिल्ह्यात दाखल होणार आहे.
   गतवर्षी बाला उपक्रमाच्या माध्यमातून अंगणवाड्यांचे रूपांतर हॅप्पी होम मध्ये करण्याची संकल्पना राबविण्यात आली होती.या उपक्रमालाही पुरस्कार मिळाला होता. त्या पाठोपाठ आता राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कार मिळत असल्याने आमदार निलंगेकर यांची कल्पकता आणि जिल्हा परिषदेच्या कार्यक्षमतेचे कौतुक होत आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *