• Thu. Aug 14th, 2025

सीटीईटी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ कार्यक्रम उत्साहात संपन्न

Byjantaadmin

Mar 23, 2023

सीटीईटी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ कार्यक्रम उत्साहात संपन्न

सोलापूर-(  हाफिज सनाउल्लाह शेख ) डिसेंबर २०२२ ते फेब्रुवारी २०२३ रोजी दरम्यान घेण्यात आलेल्या केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेतमध्ये उत्तीर्ण झालेल्या ३५ विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ कार्यक्रम सोलापुरातील ब्रेनी बॅजर अॅकॅडमीमध्ये उत्साहात संपन्न झाला.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. ह. ना. जगताप सर (माजी प्राचार्य, दयानंद बी.एड. कॉलेज), डॉ.अश्विन बोंदार्डे (प्राचार्य, कस्तुरबाई कॉलेज ऑफ एज्युकेशन सोलापूर), डॉ. पदमश्री भोजे (प्राध्यापक, दयानंद कॉलेज ऑफ एज्युकेशन सोलापूर.), डॉ. नागेश सर्वदे (प्राचार्य, माऊली शिक्षण शास्त्र महाविद्यालय वडाळा), इलियास शेख (प्राध्यापक, एम ए पानगल अंगलो उर्दू हायस्कूल सोलापूर.) व प्राध्यापक तय्यब शेख हे उपस्थित होते.
या सीटीईटी परीक्षेमध्ये अॅकॅडमीमधील ४० विद्यार्थी बसले होते. त्यापैकी ३५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा बुके व पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमावेळी बोलताना डॉ. ह. ना. जगताप म्हणाले ही सीटीईटी परीक्षा कठीण असून त्याचा निकाल कमीच लागतो. बहुतांश विद्यार्थ्यांना या परीक्षेविषयी जास्त माहितीही नाही. अशा परिस्थितीमध्ये ब्रेनी बॅजर अॅकॅडमीतील ३५ विद्यार्थी उत्तीर्ण होणे ही गोष्ट साधी नाही. यामागे तय्यब शेख यांनी खूप मेहनत घेतली आहे.
या कार्यक्रमावेळी बोलताना डॉ. अश्विन बोंदार्डे म्हणाले ही परीक्षा कठीण असून या परीक्षेमध्ये आशयाबरोबरच तंत्राला सुद्धा खूप महत्त्व आहे. हे तंत्र या अकॅडमीला अवगत झाले आहे याच गोष्टीचा फायदा डी.एड.व बी एड धारक विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात करून घ्यावा जेणेकरून या परीक्षेमध्ये यश लवकरच संपादन होईल.
या कार्यक्रमावेळी बोलताना डॉ. पदमश्री भोजे म्हणाल्या कोणतीही परीक्षा देताना त्याचे नियोजन आणि सराव हा महत्त्वाचा असतो. तय्यब शेख सर यांनी सीटीईटी परीक्षेच्या अभ्यासाचे उत्तम नियोजन करून फक्त ४५ दिवसांमध्ये विद्यार्थ्यांचा चांगला सराव घेऊन अॅकॅडमीने आपले नाव सोलापुरातच नव्हे तर भारतभर उंचावले आहे.
यावेळी बोलताना डॉ. नागेश सरवदे म्हणाले कमी दिवसांमध्ये विद्यार्थ्यांना उत्तम प्रकारे अध्यापन करून, कमी दिवसांमध्ये देखील यश संपादन करता येतं हे या अॅकॅडमीने दाखवून दिले आहे.
यावेळी बोलताना इलियास शेख म्हणाले गुरु विना जीवन अंधकारमय आहे. विद्यार्थ्यांचे जीवन प्रकाशमान करण्याचे उत्तम काम ब्रेनी बॅजर अॅकॅडमीतील तय्यब शेख हे करत आहेत.
यावेळी बोलताना तय्यब शेख म्हणाले विद्यार्थ्यांच्या समोर कमी कालावधी होता, त्यांना वेळेचे नियोजन कसे करावे, कमी कालावधीमध्ये अभ्यास कसा करावा, प्रश्नपत्रिकांचा सराव कसा करावा या सर्व गोष्टींचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले. विद्यार्थ्यांनीही जिद्द चिकाटी व मेहनतीने हे यश संपादन केले आहे. हे यश म्हणजे त्यांच्याच कष्टाचे फळ आहे असे त्यांनी सांगितले.
यावेळी विद्यार्थ्यामधून निलेश गायकवाड, मालिक नदाफ, रजनी पाटील व अक्षता येळेगावकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हाफिज सनाउल्लाह शेख व तहमिन चांदा यांनी केले या कार्यक्रमाची प्रस्तावना प्राध्यापक तय्यब शेख यांनी केली. तर आभार प्रदर्शन सौरभ भांड यांनी केले.
हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी अॅकॅडमीचे शुभम उपाध्ये, इरफान शेख, अलीं नल्लामनदू, माधवी उपाध्ये, प्रदीप उपाध्ये व एलबीपी अॅकॅडमी या सर्वांचे सहकार्य लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *