• Thu. Aug 14th, 2025

चवदार तळ्याच्या सुशोभिकरणासाठी निधी कमी पडू देणार नाही – मुख्यमंत्री

Byjantaadmin

Mar 20, 2023

अलिबाग (जिमाका): चवदार तळे सत्याग्रह दिनाचे औचित्य साधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवार (दि.१९ मार्च) रोजी रात्री उशिरा महाड येथील ऐतिहासिक चवदार तळ्याला भेट देवून महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले व बुद्धवंदनेत सहभागी झाले. चवदार तळे हा ऐतिहासिक ठेवा असून त्याच्या सुशोभिकरणासाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

यावेळी रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, आमदार भरत गोगावले, समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नरनवरे, जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे, बार्टी चे महासंचालक श्री. धम्माज्योती गजभिये, पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, प्रांताधिकारी प्रतिमा पुदलवाड, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री.नामदे, महाड तहसिलदार सुरेश काशीद, महाड मुख्याधिकारी महादेव रोडगे, पोलादपूर तहसिलदार श्रीमती दीप्ती देसाई आदि मान्यवर उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सुवर्ण मंदिराच्या धर्तीवर चवदार तळ्यासाठी देखील पाणी शुद्धीकरण यंत्रणा कार्यान्वित करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्याचे सांगितले. चवदार तळे हा ऐतिहासिक ठेवा असून त्याच्या सुशोभिकरणासाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *