देशभरात सध्या सर्वोच्च न्यायालयाचे सर न्यायाधीश धनंजय चंद्रचूड व सुप्रीम कोर्टावर आक्षेपार्ह सोशल मीडिया पोस्ट करणाऱ्या ट्रोल आर्मीविरुद्ध राष्ट्रपतींना एक डझन खासदारांनी पत्र लिहिले आहे. या संदर्भातील पत्र देशाच्या अटर्नी जनरल यांनाही पाठवले आहे. या पत्राच्या माध्यमातून ट्रोल आर्मीविरुद्ध कठोर कारवाई व न्यायालयीन संस्थेला बदनाम करणे तसेच सुप्रीम कोर्टाच्या निकालावर प्रश्न उपस्थित करणाऱ्या आक्षेपार्ह सोशल मीडिया पोस्ट हटवण्याची मागणी केली आहे. हे पत्र राज्यसभा खासदार व वकील विवेक तन्खा, यांच्याकडून पाठवण्यता आले आहे. महाराष्ट्रातील राजकीय संघर्षावर सुप्रीम कोर्टात सध्या सुनावणी सुरू आहे.
अॅटर्नी जनरलनाही लिहिले पत्र, अहवाल मागवण्याची मागणी
देशाचे अॅटर्नी जनरल यांनाही पत्र पाठवून देशाचे प्रथम न्यायिक अधिकारी असल्या कारणाने न्यायालयीन संस्थेच्या प्रतिष्ठेचे रक्षण करावे,अशी मागणी केली आहे. या प्रकरणात दिल्ली पोलिस आयुक्तांकडून अहवाल मागवावा,अशीही मागणी करण्यात आली आहे.