काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी केंब्रिज विद्यापीठात केलेल्या वक्तव्यावरून भाजपने आक्रमक पवित्रा घेतला आहे. राहुल गांधी यांनी माफी न मागितल्यास त्यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द करण्याची मागणी भाजप खासदारांकडून होत आहे. यामुळे आता राहुल गांधी यांची खासदारकीही धोक्यात आली आहे. संसद, लोकशाही आणि संस्थांचा अवमान करणाऱ्या विधानांमुळे त्यांच्याविरोधात विशेष समिती स्थापन करण्याची मागणी भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी केली आहे.
केंब्रिज विद्यापीठात केलेल्या वक्तव्यावरुन rahul gandhi यांनी माफी न मागितल्याने त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यासाठी भाजपने आक्रमक पवित्रा घेतला आहे. खासदार निशिकांत दुबे यांनी राहुल यांच्या संसद, लोकशाही आणि संस्थांचा अवमान करणाऱ्या विधानांमुळे त्यांच्याविरोधात विशेष समिती स्थापन करण्याची मागणी केली आहे राहुल यांचे लोकसभा सदस्यत्व संपवण्यासाठी विशेष समिती स्थापन करावी, अशी मागणी केली आहे.
राहुल गांधींनी युरोप-अमेरिकेत केलेल्या वक्तव्यांमधून संसद आणि देशाच्या प्रतिष्ठेला सातत्याने कलंक लावला आहे.त्यामुळेच त्यांना संसदेतून काढून टाकण्याची वेळ आली असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान, गुरुवारी (16 मार्च) संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासोबत संसद भवनात आठ वरिष्ठ मंत्र्यांची बैठक झाली.ज्यामध्ये आगामी काळात राहुल यांच्या विरोधात हे प्रकरण पुढे नेण्यावर चर्चा झाली.राहुल गांधींना कोंडीत पकडण्यासाठी भाजप आक्रमक झाली आहे. आत्तापर्यंत झालेले राजकीय हल्ले पाहता, गेल्या चार दिवसांपासून रोज सकाळी एक कॅबिनेट मंत्री राहुल गांधींवर हल्लाबोल करत आहेत.राहुल गांधींनी माफी मागावी,अशी मागणी भाजपकडून सातत्याने होत आहे.
पण दुसरीकडे, माझ्यावर झालेल्या आरोपांना उत्तर द्यायचं आहे, मला सभागृहात बोलायचं आहे पण मला बोलू दिले जाईल असं वाटत नाही. चार मंत्र्यांनी माझ्यावर आरोप केले आहेत. त्यामुळे मला त्यावर उत्तर देण्याचा माझील लोकशाही अधिकार आहे, असे राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.