ग्रामीण घरकुल योजना अंतर्गत दुसऱ्या हप्यात वाढ;दुसऱ्या हप्त्यापोटी आता मिळणार 70 हजार रुपये
लातूर, (जिमाका) : प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत राज्य शासनाकडून देण्यात येणाऱ्या दुसऱ्या हप्तात वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता 45 हजार ऐवजी दुसरा हप्ता 70 हजार रुपयांचा मिळणार आहे. तरी विविध टप्प्यावर प्रलंबित असलेली घरकुले लाभार्थ्यांनी पूर्ण करून घेण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांनी केले आहे.
प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत जिल्ह्यात आतापर्यंत 20 हजार 293 लाभार्त्यांना मंजूर देण्यात आली आहे. त्यापैकी 12 हजार 20 लाभार्थ्यांना दुसरा हप्ता वितरीत करण्यात आला असून 4 हजार 708 लाभार्थ्यांना दुसऱ्या हप्त्याचे वितरण करणे प्रलंबित आहे. या लाभार्थ्यांना यापुढे दुसरा हप्ता 70 हजार रुपयेप्रमाणे वितरीत करण्यात येणार आहे. यापुढे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत पहिला हप्ता 15 हजार रुपये, दुसरा हप्ता 70 हजार रुपये, तिसरा हप्ता 30 हजार रुपये आणि चौथा हप्ता 5 हजार रुपये असा राहणार आहे, अशी माहिती जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक कल्पना क्षीरसागर यांनी दिली