• Wed. May 7th, 2025

महाराष्ट्रातील ‘या’ दोन बँकांवर आरबीआयचे आर्थिक निर्बंध

Byjantaadmin

Mar 14, 2023

पुण्यातल्या दोन बँकांवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) आर्थिक निर्बंध घातले आहेत. थकबाकीचं प्रमाण वाढल्यानं पुणे सहकारी बँक आणि डिफेन्स अकाऊंट्स सहकारी बँकेवरही निर्बंध घालण्यात आलेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानेच ही कारवाई केली.

तेव्हा पुढचे सहा महिने या बँकांना नवीन कर्जवाटप करता येणार नाही, तसेच ठेवीही स्वीकारता येणार नाहीत.  मात्र पुणे सहकारी बँकेच्या खातेदारांना जास्तीत जास्त 10 हजार तर डिफेन्स सहकारी बँकेच्या ठेवीदारांना 30 हजार रुपयांपर्यंतची रक्कम काढता येईल. तर पाच लाखांपर्यंतच्या ठेवींना विमा संरक्षण देण्यात आले आहे.

बँक नियमिता आणि महाराष्ट्रस्थित पुणे जिल्ह्यातील  पुणे सहकारी बँक , डिफेन्स अकाऊंट्स सहकारी बँकेच्या ग्राहकांना त्यांच्या खात्यातून पैसे काढता येणार नाहीत, आरबीआयने कर्जदारांवर निर्बंध लादले आहेत  रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दोन सहकारी बँकांवर त्यांच्या बिघडलेल्या आर्थिक स्थितीच्या पार्श्वभूमीवर निर्बंध लादले आहेत.

मध्यवर्ती बँकेने जारी केलेल्या दोन निवेदनानुसार पुणे सहकारी बँक , डिफेन्स अकाऊंट्स सहकारी बँक (महाराष्ट्र) यांच्यावरील निर्बंध सहा महिन्यांसाठी लागू राहतील. त्यामुळे आता ग्राहकांना पैसे काढण्यास अडचण निर्माण होणार आहे. मात्र, 10 ते 30 हजारपर्यंतच रक्कम काढता येणार आहे. त्यामुळे ग्राहकांना थोडासा दिलासा मिळाला आहे.

दोन्ही बँका आता RBI अनुदानाच्या पूर्व परवानगीशिवाय किंवा कर्जाचे नुतनीकरण करु शकत नाहीत, कोणतीही गुंतवणूक करु शकत नाहीत, निधीची उधार घेणे आणि नवीन ठेवी स्वीकारण्यासह कोणतेही दायित्व स्वीकारु शकत नाहीत. दोन्ही बँका त्यांची आर्थिक स्थिती सुधारेपर्यंत निर्बंध लागू असणार आहेत. सहामहिन्यानंतर याबाबत आता ठोस निर्णय घेतला जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *