जागतिक महिला दिनाच्या निमित्त लातूर महानगरपालिकेच्या वतीने महिला मेळावा संपन्न
महिलांनी मोफत सिटी बस सेवेचा लाभ घ्यावा – आयुक्त बाबासाहेब मनोहरे
लातूर – जागतिक महिला दिनानिमित्त लातूर शहर महानगरपालिका दीनदयाळ अंत्योदय योजना- राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान ( DAY-NULM) , महिला व बालकल्याण विभाग मनपा लातूर यांचे संयुक्त विद्यमाने शहरातील महिला बचत गटातील महिलांचा महिला मेळावा पडिले मंगल कार्यालय येथे संपन्न झाला.
कार्यक्रमाचे उद्घाटन आयुक्त बाबासाहेब मनोहरे व सर्व मान्यवरांच्या शुभहस्ते राष्ट्रमाता जिजाऊ, माता रमाई व क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आले. त्यानंतर स्वागतगीताने कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून बाबासाहेब मनोहरे आयुक्त लातूर शहर महानगर पालिका लातूर हे लाभले तर कार्यक्रमास मयुरा शिंदेकर,उपायुक्त लातूर मनपा, वीणा पवार ,उपायुक्त लातूर मनपा, मंजुषा गुरमे, सहायक आयुक्त लातूर मनपा,निकीता भांगे, सहायक नगर रचनाकार हे मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वीणा पवार उपायुक्त तथा शहर प्रकल्प अधिकारी यांनी केले त्यानंतर सर्व मान्यवरांच्या शुभहस्ते दीनदयाळ अंत्योदय योजना-राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानातील विविध घटकातील लाभ घेऊन त्यांच्या जीवनात झालेल्या बदलाचे यशोगाथा पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांच्या शुभहस्ते शहरातील विविध क्षेत्रातील रणरागिणी महिला मान्यवरांचा सन्मानपत्र व शाल देऊन सन्मान करण्यात आला यात मयुरा शिंदेकर,उपायुक्त लातूर मनपा- प्रशासनातील उत्कृष्ट अधिकारी, डॉ.कांचन जाधव स्त्रीरोग तज्ञ विलासराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय , शीलाताई वाघमारे संचालिका-लिज्जत पापड महिला उद्योग, प्रा.मेघा पंडित, दयानंद महाविद्यालय लातूर, डॉ.उर्वी नागुरे, रॉबिन हूड आर्मी, लातूर, जागृती शिंदे, सेलीब्रेटी मेकअप आर्टिस्ट, माधुरी माकणीकर,सव्ही मिसेस इंडिया प्रतियोगिता विजेता 2019 ,संगीता बरुरे,सखी महिला बचतगट, आसावरी बोधनकर –जोशी- गायिका यांचा समावेश होता. त्याचप्रमाणे महानगरपालिका ई-घंटागाडी द्वारे कचरा संकलन करणाऱ्या विविध महिला बचत गटातील सदस्यांचा प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला यात गंगा सकट, कांचन सकट, वंदना सकट, प्राजक्ता कांबळे, पुजा आवचार, अर्चना गायकवाड, भागाबाई कांबळे, चांदणी काळे यांचा समावेश होता. सदर कार्यक्रमासाठी पडिले हॉलचे मालक सचिन पडिले यांनी विनामूल्य 2000 आसन क्षमतेचा एसी हॉल उपलब्ध करून दिला याबद्दल सचिन पडिले व “होम मिनिस्टर” – खेळ पैठणीचा बक्षीसाचे प्रथम , द्वितीय व व तृतीय पैठणी तुकाराम पाटील,संचालक द्वारकादास शाम कुमार, लातूर यांचे सौजन्याने दिल्या त्याबद्दल त्या दोघांनाही सन्मानित करण्यात येऊन त्यांचे आभार मानण्यात आले.सदर कार्यक्रमावेळी सर्व मान्यवरांनी बचत गटांनी उभारलेल्या स्टॉलचे पाहणी करून कौतुक केले व त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
त्यानंतर उपस्थित सत्कारमूर्ती पैकी डॉ.कांचन जाधव यांनी महिला व आरोग्याची काळजी , शीलाताई वाघमारे संचालिका, यांनी महिला व उद्योग, प्रा.मेघा पंडित यांनी महिला सक्षमीकरण आणि मुलींचे शिक्षण, डॉ.उर्वी नागुरे यांनी आपल्या कार्याचे रस्त्यावरील मुलांचे शिक्षण, अनाथ व्यक्तीना अन्न छत्र, याविषयी आपले मनोगत व्यक्त केले. त्यानंतर अध्यक्षीय समारोप बाबासाहेब मनोहरे, आयुक्त, लातूर शहर महानगर पालिका लातूर यांनी केले. यात त्यांनी उपस्थित महिलाना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देऊन महिलाना मनपाच्या वतीने मोफत सिटी बसची व्यवस्था केलेली आहे त्याचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन केले.
कार्यक्रमाचा शेवट “होम मिनिस्टर” – खेळ पैठणीचा या खेळाने झाला या खेळाचे मुख्य निवेदक दुर्गाप्रसाद मोटे यांनी सलग 3 तास बहारदार निवेदनाच्या जोरावर हा खेळ पूर्ण केला त्यात प्रथम पारितोषिक मानाची पैठणी भाग्यश्री कुंकुले यांना , द्वितीय सेमी पैठणी अनीता पवार यांना , तृतीय आर्ट पैठणी पूनम थोरात यांनी पटकाविले. तर रेश्मा ढवळे व माया कोकणे या दोन महिलाना उत्तेजनार्थ पारितोषिक व 10 महिलाना सहभागी असल्या बाबत बक्षीस देण्यात आले. सदर बक्षीस वितरण तुकाराम पाटील,संचालक द्वारकादास शाम कुमार, लातूर यांचे हस्ते देण्यात आले. यावेळी त्यांनी उपस्थित महिलाना मार्गदर्शन केले . कार्यक्रमास शहर अभियान व्यवस्थापक विशाल गुडसूरकर , चंद्रकांत तोडकर , समुदाय संघटक वीरेंद्र सातपुते , सर्व समूह संसाधन व्यक्ती, शहर स्तरीय संघाचे अध्यक्ष संगीता सरवदे, सना शेख, छाया मुसळे, अनीता गायकवाड यांनी कार्यक्रमाचे यशश्वितेसाठी सहकार्य केले व जवळपास 2000 हून अधिक महिला बचत गटातील महिला सदस्य एक समान युनिफॉर्म मध्ये उपस्थित होते हे या कार्यक्रमाचे विशेष वैशिष्ठ्य व आकर्षण ठरले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शहर अभियान व्यवस्थापक महारुद्र गालट , लक्ष्मण जाधव , नितीन सुरवसे यांनी केले तर आभार शहर अभियान व्यवस्थापक लक्ष्मण जाधव यांनी मानले.