अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याच्या मागणीसाठी आजही विरोधक आक्रमक झाले आहेत. शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी करत आज विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली.
LIVE
- 10 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक असणारा महिंद्रा इलेक्ट्रिकलचा प्रोजेक्ट नाशिक येथून पुणे येथे हलवले जात असल्याचे वृत्त नाशिक येथील विविध वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेले होते. आज आमदार देवयानी फरांदे यांनी विधानसभेत हा विषय उपस्थित करून याबाबत उद्योग मंत्र्यांनी स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी केली. याबाबत स्पष्टीकरण देताना उद्योग मंत्री यांनी पुणे येथे महिंद्रा अँड महिंद्रा प्रकल्प सुरू करत असल्याची बाब खरी आहे परंतु हा प्रकल्प नाशिक येथून वर्ग न होता नाशिक येथेदेखील महिंद्रा उद्योग समूह गुंतवणूक करणार असल्याचे स्पष्टीकरण दिले.
- अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई देण्याच्या मागणीसाठी अधिवेशनात विरोधकांनी सरकारला चांगलेच घेरले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह माजी कृषिमंत्री दादा भूसेदेखील सभागृहात विरोधकांची समजूत घालण्याचा प्रयत्न करत आहेत. या सर्व गदारोळात विद्यमान कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांचा अवकाळीबाबतचा एक शब्दही अद्याप ऐकू आलेला नाही.
- राष्ट्रवादी काँग्रेसने नागालँडमध्ये दिलेल्या पाठिब्यांचे पडसाद आज विधानसभेत उमटले. मंत्री गुलाबराव पाटील यांनी नागालँडमध्ये पन्नास खोके, एकदम ओके झाल्याचा आरोप केला. त्यावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आक्षेप घेतला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका कशी दुटप्पी असल्याचे ते सांगितले. शिवाय काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांच्या घरावर दगड फेकू नये, असे सूचक वक्तव्य केले.
- अवकाळी पाऊस, देशोधडीला लागलेला शेतकरी आणि मुख्यमंत्र्यांनी घोषणा करून जाहीर न झालेली नाफेडची खरेदी यावरून विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत सरकारला घेरले. कृषिमंत्र्यांच्या मतदार संघात शेतकरी आत्महत्या सुरू असून, पण सरकार अजून हा प्रश्न गांभीर्याने घेतला नसल्याचा आरोप केला.
- अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्याबाबत सरकारकडून काहीही सांगितले जात नाही, असा आरोप करत विधानसभेत आज विरोधकांनी सभात्याग केला आहे. तसेच, अनेक भागात नाफेडने अजूनही कांदा, हरभरा खरेदी सुरू केलेली नाही. सरकार सभागृहात खोटे बोलत आहे, असा आरोपही विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला.
- अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतीचे युद्धपातळीवर पंचनामे केले जाईल. अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत केली जाईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे.
- आज अधिवेशनात केवळ अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर चर्चा करावी, अशी मागणी करत विधानसभेत विरोधकांनी स्थगन प्रस्ताव सादर केला आहे. मात्र, विधानसभा अध्यक्षांनी तो फेटाळून लावला आहे. त्यामुळे विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व ठाकरे गटाच्या आमदारांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात येत आहे.
- अवकाळीग्रस्त शेतऱ्यांना नुकसान भरपाई मिळालीच पाहीजे, बळीराजाला तातडीने मदत करा, अन्यथा खुर्च्या सोडा, अशा घोषणा विरोधकांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर दिल्या. या आंदोलनात विरोधी पक्षनेते अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ, रोहित पवार यांच्यासह काँग्रेस व शिवसेनेचे आमदार सहभागी झाले होते.
- राज्यात सत्तांतर होताच शिंदे-फडणवीस सरकारने विकासकामांना स्थगिती दिली, याचाही निषेध करत विरोधकांनी सत्ताधाऱ्यांविरोधात घोषणा दिल्या.
- सत्तांतरानंतर आज शिंदे-फडणवीस सरकार प्रथमच आपला अर्थसंकल्प सादर करत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्याकडे अर्थविभागाचा कारभार आहे. त्यामुळे अर्थमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचाही हा पहिलाच अर्थसंकल्प आहे. दुपारी दोन वाजता देवेंद्र फडणवीस विधानसभेत अर्थसंकल्प
- काही दिवसांपूर्वी कसबा, पिंपरी-चिंचवड पोटनिवडणुका झाल्या. नवनिर्वाचित आमदार रवींद्र धंगेकर व अश्विनी जगताप यांनी आज विधानसभेत आमदारकीची शपथ घेतली. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जगताप आणि धंगेकर यांना शपथ दिली.