• Tue. Aug 5th, 2025

साहेब गद्दारी का केली? खासदार धैर्यशील मानेंना ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी विचारला जाब

Byjantaadmin

Mar 8, 2023

शिंदे गटाचे खासदार धैर्यशील माने यांचा ताफा ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी रोखला. साहेब गद्दारी का केली? असा जाब यावेळी शिवसैनिकांनी खासदार माने यांना विचारला. कोल्हापुरातील हातकणंगले तालुक्यातील चंदूर येथे आज ही घटना घडली. यावेळी बंदोबस्ताला असणाऱ्या पोलिसांनी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना रोखलं, त्यामुळे संघर्ष टळला

 

Dhairyasheel Mane canvey  shivsena ubt party workers stopped car of mp dhairyasheel mane hatkanangale साहेब गद्दारी का केली?  खासदार धैर्यशील मानेंना ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी विचारला जाब 

एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांनी सोबत घेत वेगळी वाट धरल्यापासून शिवसेनेतील संघर्ष वाढला आहे. त्यामुळे राज्यातील वातावरणही ढवळून निघाले आहे. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे असे शिवसेना दोन भागात विभागली गेली. ठाकरे गटाच्या शिवसैनिकांकडून शिंदे गटातील नेत्यांना गद्दारी का केली? असा सवाल विचारला जातोय. याचाच प्रत्यय आज पुन्हा आला. शिंदे गटाचे खासदार धैर्यशील माने यांचा ताफा ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी रोखला. साहेब गद्दारी का केली? असा जाब यावेळी शिवसैनिकांनी खासदार माने यांना विचारला. ठाकरे गटाचे शिवसैनिक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. माने यांचा ताफा आल्यानंतर ते आक्रमक झाले होते. यावेळी कार्यकर्त्यांनी साहेब गद्दारी का केली? असा संतप्त सवाल उपस्थित केला. बळाचा वापर करत पोलिसांनी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना बाजूला केलं.

हातकणंगले मतदारसंघाचे खासदार धैर्यशील माने चंदूर येथे कार्यक्रमानिमित्त जात होते. त्यावेळी शिवसेना ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी माने यांचा ताफा अडवला. यावेळी मोठ्या संख्येनं कार्यकर्ते जमले होते. साहेब गद्दारी का केली? असा सवालही यावेळी त्यांनी उपस्थित केला. उद्धव ठाकरे यांच्या नावाने घोषणाबाजीही करण्यात आली. कार्यकर्त्यांकडून माने यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली. याचवेळी शिंदे गटाचे समर्थकही आल्याने दोन्ही गटाच्या समर्थकांमध्ये बाचाबाचीही झाली. पण पोलिसांनी दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना बाजूला करत संघर्ष टाळला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *