LATUR :- तू बी रुजवणारी, तू झाडे लावणारी, तू झाडे जगवणारी, तू झाडांना मोठ करणारी, तू शहराचे सुशोभीकरण करणारी, तू जनप्रबोधन करणारी, तूच वृक्ष कन्या, तूच वृक्ष मैत्रीण, तूच शहराला हिरवागार साज चढविणारी, तूच ग्रीन लातूर वृक्ष टीमची सन्माननीय. तुला-तुझ्या कार्याचा सन्मान करणे हे आमचं आद्य कर्तव्य. तुझा आम्हाला सार्थ अभिमान. असे म्हणत ग्रीन लातूर वृक्ष टीमच्या सदस्यांनी टीम मधील महिला सदस्यांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यापूर्वी आज जागतिक महिला दिनानिमित्त ग्रीन लातूर वृक्ष टीमच्या महिला सदस्यांनी राणी अहिल्याबाई होळकर चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक पर्यत हजारो झाडांना दोन टँकरद्वारे full पाणी दिले. यावेळी लातूर जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्त्यां वृक्षप्रेमी, प्रगतीशील शेतकरी सौ. आशाताई भिसे यांच्या शुभ हस्ते ग्रीन लातूर वृक्ष टीमच्या ऍड वैशाली लोंढे, दीपाली राजपूत, मनीषा कोकणे, कल्पना कुलकर्णी, पूजा पाटील, विदुला राजमाने,दिक्षा चलवाड, नीता कानडे, पुष्पा कांबळे, तुळसा राठोड, प्रिया नाईक या महिला सदस्यांना “वृक्ष मैत्रीण” गौरव पत्र देऊन गौरविण्यात आले.