औसाचे आ.अभिमन्यू पवारांनी करून दाखवले….!
औसा विधानसभा मतदार संघातील शेतकऱ्यांना गोगलगायी नुकसानीचे मिळणार ६६ कोटी ८१ लाख
सतत पडणाऱ्या पावसाच्या नुकसानीचे ४५ कोटी बाबत आमदार पवारांचा पाठपुरावा सुरू…
औसा:आमदार अभिमन्यू पवार यांच्या यशस्वी पाठपुरावा औसा विधानसभा मतदार संघातील शेतकऱ्यांना फलदायी ठरला असून गोगलगायी नुकसानी पोटी मिळालेल्या जिल्ह्याला एकूण मिळालेल्या ९४ कोटी पैकी सर्वाधिक ६६ कोटी ८१ लाखाची मदत एकट्या औसा विधानसभा मतदार संघातील शेतकऱ्यांना मिळणार असून महसूल विभागाच्या वतीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची यादी करून नुकसानीचे अनुदान प्राप्त होताच वाटप करण्यासाठी जलद प्रक्रिया सुरू करण्यात आली असून आमदार पवारांनीच तशा सूचना प्रशासनाला दिल्याचे कळते दरम्यान औसा तालुक्यातील ४७हजार २५१शेतकऱ्यांना ५१ कोटी १७ लाख तर मतदार संघातील निलंगा येथील ६८ गावातील १६१०० शेतकऱ्यांना १५ कोटी ६४ लाख एवढी मदत मिळणार आहे..
यावर्षी गोगलगायी व सतत पडणाऱ्या पावसामुळे औसा मतदार संघातील हजारो शेतकऱ्यांचे हातचे आलेले पीक निघून गेले याबाबत आमदार अभिमन्यू पवार यांनी पावसाळी अधिवेशनात चर्चा घडवून आणली त्या नंतर लक्षवेधी करीत लातूर,उस्मानाबाद, बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना गोगलगायी व सतत पडणाऱ्या पावसाच्या नुकसानीची मदतीची मागणी केली होती आमदार अभिमन्यू पवार यांच्या मागणी नंतर खुद्द कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी औसात येऊन नुकसानी पाहणी केली शासनाने केवळ अतिवृष्टी भागातील शेतकऱ्यांना मदतीची घोषणा केली होती मात्र आमदार पवारांनी केलेल्या लक्षवेधी बाबत निर्णय घेतला नव्हता कापसावर पडलेल्या बॉण्ड आळीचा धर्तीवर गोगलगायी मदतीची तसेच सतत पडणाऱ्या पावसाच्या नुकसानीचे विदारक चित्र सरकार व कृषी मंत्री यांच्या निदर्शनास आणून दिले आणि यंत्रणा सक्रिय झाली दरम्यान मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री व कृषिमंत्री यांनी मदतीचे आश्वासन दिले होते कारण त्या मदती बाबत शासन निर्णय घेण्यात आला नव्हता सदर निर्णय घेण्यात यावी व मदत जाहीर करावी असे निवेदन गेल्याच आठवड्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आ. पवारांनी दिले आणि दोन दिवसांतच शासनाने गोगलगायी संदर्भात शासकीय जीआर काढून मदतीची घोषणा केली आहे आणि याच अनुषंगाने नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी हालचाली सुरू झाल्या असून औसा तहसीलदार व निलंगा तहसीलदार हे दोघांनी तलाठी मार्फत नुकसानीचे यादी संकलन करण्यासाठी जलद हालचाली सुरू केल्या आहेत एकूणच आमदार अभिमन्यू पवार यांच्या पाठपुरावा फळास आला आणि लातूर जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना विशेषतः औसा मतदार संघातील शेतकऱ्यांना फायदा मिळाला आहे …
..
सतत पडणाऱ्या पावसाने नुकसानीचे ४५ कोटी मिळणार…
…दरम्यान गोगलगायी नुकसानीची मदत जाहीर करण्यात आली असताना सतत पडणाऱ्या पावसाने हजारो हेक्टर वरील पिकाचे नुकसान झाले आहे सदर नुकसानीचे पंचनामे करण्यात आले असून औसा तालुक्यातील ३८ हजार ५८१ शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून जवळपास ३४ कोटी ११ लाख ४२ हजार ४०० रुपये एवढी नुकसान भरपाई आवश्यक आहे तसेच निलंगा तालुक्यातील औसा मतदार संघातील ६८ गावातील हजारो शेतकरी यांचा समावेश करून जवळपास ४५ कोटी रुपये एवढी मदत लागणार आहे याबाबत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना आमदार अभिमन्यू पवार यांनी उर्वरित ४५ कोटींची मदत तातडीने वितरित करावी तशी मागणी केली आहे व सचिवांना ही फोन द्वारे कळवले असून लवकरच उर्वरित मदत मिळणार असल्याचे आमदार अभिमन्यू पवार यांनी सांगितले आहे दरम्यान गोगलगायी नुकसानीचे ६८ कोटी ८१ लाख व सतत पाऊस नुकसानीचे ४५ कोटी असे १११ कोटी ८१ लाखाची मदत शेतकऱ्यांना मिळणार असून प्रथमच औसासाठी १०० कोटीहून अधिक मदत शेतकऱ्यांना मिळणार असल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.