आपण अशा युगात जगत आहोत. जिथे लोकांमध्ये संयम आणि सहनशीलता कमी झाली आहे. सोशल मीडियाच्या जमान्यात जर एखाद्याला तुमचा विचार पटत नसेल तर ते तुम्हाला ट्रोल करायला लागतात. असे विधान देशाचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी शुक्रवारी केली.
पुढे बोलताना CJI म्हणाले की, सोशल मीडियावर ज्या वेगाने खोट्या बातम्या पसरतात त्यामुळे सत्याचा बळी गेला आहे. एक खोटी गोष्ट बीजाप्रमाणे पेरली जात आहे आणि कालांतराने त्याचे रुपांतर एका मोठ्या सिद्धांतात होते. ज्याला तर्काच्या आधारे मोजता येत नाही. म्हणूनच कायद्याला विश्वासाचे जागतिक चलन म्हटले जाते.
संविधान हे जागतिकीकरणाचे सर्वात मोठे उदाहरण
अमेरिकन बार असोसिएशन (एबीए) इंडिया कॉन्फरन्स 2023 मधील ‘लॉ इन द एज ऑफ ग्लोबलायझेशन : कन्व्हर्जन्स ऑफ इंडिया अँड द वेस्ट’ या चर्चासत्रात CJI बोलत होते. ते म्हणाले की- जेव्हा राज्यघटना तयार केली गेली तेव्हा ते एक दस्तऐवज होते. ज्यामध्ये जगभरातील सर्वोत्तम पद्धतींचा समावेश होता. त्यामुळे मोठे बदल होऊ शकले असते. परंतू आता आपल्या दैनंदिन जीवनावर जगात घडणाऱ्या गोष्टींचा परिणाम होत आहे.
CJI डीवाय चंद्रचूड म्हणाले की, भारतीय राज्यघटनेचे मुख्य शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाचा मसुदा तयार करण्याच्या प्रक्रियेत जागतिक सहभागाचे महत्त्व स्पष्ट केले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हटले होते की, संविधानात केवळ जगाकडून प्रेरणा घेतली गेली नाही. ज्यामध्ये देशातील जनतेच्या गरजा लक्षात घेऊन संविधानाची निर्मिती करण्यात आली आहे. हे एक अतिशय अद्वितीय भारतीय प्रोडक्ट आहे, जे जागतिक देखील आहे.

आम्ही न्यायाधीश असून देखील ट्रोलिंगपासून वाचू शकत नाही
CJI म्हणाले की, अनेक प्रकारे भारतीय संविधान हे जागतिकीकरणाचे सर्वात मोठे उदाहरण आहे. ते देखील अशा वेळी जेव्हा आपण जागतिकीकरणाच्या युगात प्रवेश केला नव्हता. राज्यघटनेचा मसुदा तयार झाला तेव्हा त्याच्या निर्मात्यांना जग कसे बदलेल याची कल्पना नव्हती.
CJI म्हणाले की, त्यावेळी आमच्याकडे साधे इंटरनेट देखील नव्हते. अशा युगामध्ये आम्ही होतो की, अल्गोरिदम देखील चालत नव्हता. सोशल मीडिया तर हा विषयच नव्हता. आज प्रत्येक छोट्या गोष्टीसाठी तुम्हाला भीती वाटते की, लोक तुम्हाला सोशल मीडियावर ट्रोल करतील. एवढच काय न्यायाधीश असून देखील आम्ही ट्रोलिंगपासून वाचू शकत नाही.

जागतिकीकरणामुळे आता लोक नाराज होऊ लागले
CJI म्हणाले की, प्रवास आणि तंत्रज्ञानाच्या विस्ताराबरोबरच मानवतेचा विस्तार झाला आहे. परंतु वैयक्तिकरित्या कोण काय विचार करतो, याबद्दल एकमताची भावना गमावली आहे. त्यामुळे मानवता देखील कमी झाली आहे. हे या युगाचे मोठे आव्हान आहे. यातील बराचसा परिणाम तंत्रज्ञानामुळे झाला आहे.
ते म्हणाले की, आता जागतिकीकरणामुळे लोक दु:खी होत आहेत. जगभरातील लोक ज्या भावनिक उलथापालथीतून जात आहेत. त्यामुळे जागतिकीकरणविरोधी भावना वाढीस लागल्या आहेत. 2001 चा दहशतवादी हल्ला हे त्याचे उदाहरण म्हणतात येईल. कोविड-19 दरम्यान जगाने जागतिक मंदीचा सामना केला, परंतु ती एक संधी म्हणून उदयास आली आहे.
आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमुळे न्याय विकेंद्रित झाला असून तो न्याय पोहोचवणे अत्यंत आवश्यक आहे. सर्वोच्च न्यायालय हे केवळ टिळक मार्गावरील सुप्रीम कोर्ट नाही. ते देशातील छोट्या गावांपर्यंतचे न्यायालय आहे.
हे ही वाचा
कसबा पेठेतील पराभव म्हणजे बदलाचे वारे, देशभरातील आगामी निवडणुकांमध्ये परिणाम दिसणार