विधिमंडळ अधिवेशनाचा आज पाचवा दिवस आहे. कालचा दिवस हा मुख्यमंत्र्यांचे देशद्रोही म्हणणारच, भास्कर जाधवांचे महिन्याच्या आत जेलमध्ये टाकणार, शरद पवारांचा आमदार राम सातपुतेंनी केलेला एकेरी उल्लेख, कसब्याचा निकाल ते शेतकऱ्यांच्या बांधावरचा कांदा या मुद्द्यांनी गाजला. राज्यपालांच्या अभिभाषणावर दोन दिवस चर्चा झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावर आज उत्तर देणार आहेत. विधानसभा नवनियुक्त हक्कभंग समितीची आज बैठक होणार आहे. खासदार संजय राऊत यांच्या विरोधात हक्कभंगाबाबत चर्चा होणार आहे.
LIVE
– विविध आयुधांच्या माध्यमातून सभागृहात सदस्य विविध प्रश्न तळमळीने मांडत असतात. यावेळी सरकारच्यावतीने त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी बैठक लावण्याचे आश्वासन दिले जाते. मात्र, अनेक मंत्र्यांकडून सभागृहात आश्वासन दिलेल्या बैठकाच घेतल्या जात नाहीत, याबाबत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी संताप व्यक्त केला.
– राज्यातल्या सर्वसामान्यांचे प्रश्न सदस्य सभागृहात विविध संसदीय आयुधांचा वापर करुन मांडत असतात. हे प्रश्न सोडविण्यासाठी संबंधित मंत्री सभागृहात याविषयी बैठकी घेण्याचे आश्वासन देत असतात. मात्र आश्वासन दिलेल्या अनेक बैठका घेतल्याच जात नाहीत. त्यामुळे सर्वसामान्यांचे प्रश्न सुटत नाहीत, त्यावर कोणताही मार्ग निघत नाही. त्यामुळे सभागृहात सदस्यांना बैठका घेण्याचे दिलेले आश्वासन पाळले जावे, किमान पुढचे अधिवेशन येईपर्यंत तरी बैठकींचे आयोजन केले जावे, अशी सदस्यांची भावना अजित पवार यांनी सभागृहात व्यक्त केली.
– अंगणवाडी सेविकांचे मानधन २० टक्क्यांनी वाढवणार. सेविकांना दीडशे कोटी रुपये खर्चून नवे मोबाइल खरेदी करणार. अंगणवाडीचे भाडे एक हजारावरून दोन हजार रुपये केले. महापालिकेतील भाडेवाढीचा निर्णय लवकर घेणार. कंटेनर अंगणवाडी सुरू करणार. पहिल्या अंगणवाडीचे आज मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. अंगणवाडी सेविकांची एंट्री फक्त नाव इंग्रजीत टाकावे लागेल. इतर माहिती मराठी भरता येईल, अशी माहिती मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली.
– बायोमेट्रीक हजेरी बंधकारक करणार. मुंबई, पुणे आरोग्य केंद्रात चोवीस तास मॉनिटरींग करणार. वैद्यकीय अधिकारी गट एक ९८३ पदे रिक्त आहेत. सध्या ७५ हजार भरती सुरू आहे. त्यात ही रिक्त पदे भरली जाणार, अशी माहिती आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी विधानसभेत दिली.
– ग्रामीण रुग्णालये आणि इतर सर्व सरकारी रुग्णालयात बायोमॅट्रीक हजेरी बंधनकारक करा. आरोग्य विभागीतील वर्ग तीन आणि वर्ग चारमधील पन्नास टक्के जागा रिक्त आहेत. त्या तातडीने भराव्यात, अशी मागणी विधानसभेत आमदार राजेश टोपे यांनी केली.
बालविवाह रोखण्यासाठी समाजाने आपली मानसिकता बदलणे गरजेचे – रुपाली चाकणकर