निलंगा तालुक्यातील काँग्रेसच्या तालुका व शहर कार्याध्यक्षांच्या नियुक्त्या जाहीर
निलंगा :-आज काँग्रेसचे लातूर जिल्हाध्यक्ष श्रीशैल उटगे यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाला अधिक बळकटी आणण्यासाठी निलंगा तालुका काँग्रेस पक्षाच्या तालुका कार्याध्यक्षपदी
१) ॲड नारायणराव सोमवंशी (निलंगा तालुक्यातील निलंगा विधानसभेत असलेली गावे)
२) श्री प्रदीप होळकुंदे (निलंगा तालुक्यातील औसा विधानसभेत असलेली गावे)
३)निलंगा शहर काँग्रेसच्या कार्याध्यक्षपदी श्री फारूख खादरपाशा देशमुख
यांची नियुक्ती नियुक्ती पत्राद्वारे जाहीर केली आहे. यामुळे येणाऱ्या काळात काँग्रेस पक्ष निलंगा तालुक्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी सज्ज होऊन कामाला लागला आहे असा संदेश गेला आहे. नियुक्त झालेले तिन्ही पदाधिकारी सर्वसामान्य जनतेत मिसळून काम करणाऱ्या असल्यामुळे याचा येणाऱ्या काळात काँग्रेस पक्षाला निश्चितच फायदा होणार आहे.
या निवडीबद्दल काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस श्री अशोक पाटील निलंगेकर तसेच प्रदेश सचिव अभय साळुंके, निलंगा तालुकाध्यक्ष विजयकुमार पाटील, जिल्हा उपाध्यक्ष सुधाकर पाटील, निलंगा शहराध्यक्ष गोविंद शिंगाडे तसेच सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांमधून स्वागत होत आहे.