• Mon. Apr 28th, 2025

नापास करण्याची धमकी देत प्रयोगशाळेतच दोन अल्पवयीन विद्यार्थ्यांवर…

Byjantaadmin

Feb 27, 2023

जिल्ह्यात शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे.  कोलवड इथल्या मिलिटरी स्कूलमध्ये (Militer School) घडलेल्या एका घटनेने शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.  मिलिटरी स्कूलमधील दहावी वर्गात शिकणाऱ्या दोन अल्पवयीन विद्यार्थ्यांवर शिक्षकानेच अनैसर्गिक अत्याचार (Abuse of Students by the Teacher) केल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. याप्रकरणी एका पीडित विद्यार्थ्याने नराधम शिक्षकाविरोधात तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी आरोपी शिक्षकाविरोधात पोस्कोसह (Posco) अनैसर्गिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे नेमकी घटना?
बुलडाणा (Buldana) जिल्ह्यातील मिलिटरी स्कूल मधील अविवाहित असलेल्या एका शिक्षकाने दोन विद्यार्थ्यांचे लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पीडित मुलांच्या तक्रारीवरून विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धर्मेंद्र  हिवाळे असे या शिक्षकाचे नाव असून त्याने यापूर्वी सुद्धा अशाच प्रकारचे गैर कृत्य केल्याचं तपासात समोर आलं आहे. पण त्यावेळी शाळा व्यवस्थापनाला माफीनामा लिहून देत तो बचावला होता.

विद्यार्थ्यांना करत होता ब्लॅकमेल
तुम्हाला प्रॅक्टिकलच्या परीक्षेमध्ये नापास करेल, जीवे मारून टाकू अशी धमकी देत आरोपी शिक्षक धर्मेंद्र हिवाळे याने दहाव्या वर्गातील दोन मुलांसोबत अनैसर्गिक कृत्य केले. विज्ञानाच्या प्रयोग शाळेत सतत चार दिवस त्याने हा किळसवाणा आणि संतापजनक प्रकार केला. पीडित विद्यार्थ्यांनी सदर बाब आपल्या पालकांना आणि पालकांनी मुख्याध्यापकांना सांगितली.

मिलिटरी स्कूलच्या व्यवस्थापनाने प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत आरोपी धर्मेंद्र हिवाळे याच्या विरोधात थेट पोलीस स्टेशन गाठलं. शहर पोलिसांनी आरोपी शिक्षक हिवाळे विरोधात पोक्सो कायदा अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनंतर शहरात एकच खळबळ उडाली आहे. एवढेच नव्हे तर शाळा प्रशासनाने देखील या नराधमावर बडतर्फीची कारवाई केली आहे.
https://jantaexpress.co.in/?p=4354

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed