सोलापूर: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचे भाचे विधानपरिषद पदवीधर मतदार संघातील आमदार सत्यजीत तांबे शनिवारी सोलापूर दौऱ्यावर आले होते काँग्रेसच्या विविध नेत्यांना भेटून त्यांनी चर्चा केली.माध्यमांना माहिती देताना सत्यजीत तांबेंनी सावध भूमिका घेतली.सायंकाळी आमदार सत्यजीत तांबे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वातील शिवसेना कार्यालयात जाऊन भेट दिली. या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. बाळासाहेब थोरात यांचे भाचे सत्यजीत तांबे यांची आता काँग्रेस सोडून अपक्ष आमदार अशी ओळख निर्माण झाली आहे. शिवसेना कार्यालयात जाऊन शिवसेना जिल्हा प्रमुख अमोल बापू शिंदे व त्यांच्या कार्यकर्त्यांसोबत जवळपास त्यांनी अर्धा तास चर्चा केली. शिवसेना जिल्हा प्रमुखांनी तांबेना कार्यालयातील जिल्हा प्रमुखांच्या खुर्चीवर बसवल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या.
नाशिक मधील शिवजयंतीत शिंदे गटाच्या बॅनरवर सत्यजीत तांबे झळकलेले
नाशिक शहरात शिंदे गटाकडून शिवजयंतीनिमित्त लावण्यात आलेल्या बॅनर्सवर विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजीत तांबे यांचा फोटो झळकला होता. त्यामुळे नाशिक शहरात राजकीय चर्चांना उधाण आले होते. शिवजयंतीनिमित्त शिंदे गटाच्या डॉ. सेलच्यावतीने शहरात भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आलेलं होतं. त्या शिबिराचे बॅनर शहरात ठिकठिकाणी लावण्यात आले होते. हे बॅनर चर्चेत आले होते.त्या चर्चा ताज्या असताना सत्यजीत तांबे यांनी सोलापुरातील शिवसेना कार्यालयात जाऊन सत्कार स्वीकारला. जिल्हा प्रमुख अमोल बापू शिंदेंनी त्यांचं स्वागत केले.
स्वतःला अपक्ष म्हणणारे सत्यजीत तांबे शिवसेना कार्यालयाच्या जिल्हा प्रमुख खुर्चीवर
नाशिक पदवीधर विधानपरिषद मतदार संघातून अपक्ष म्हणून निवडून आलेले बाळासाहेब थोरात यांचे भाचे सत्यजीत तांबे यांनी स्वतःला अपक्ष असल्याच सांगत आहेत. शिंदे गट शिवसेना मधील त्यांच्या वाढत्या भेटी गाठीमुळे वेगळीच चर्चा सुरू झाली आहे.नाशिकमधील शिवजयंती उत्सवात शिंदे गट शिवसेनेच्या बॅनरवर सत्यजीत तांबे झळकले होते. सोलापूर दौऱ्यावर असताना शिंदे गट शिवसेना कार्यालयात जाऊन सत्कार स्वीकारला तर शिवसेना जिल्हा प्रमुख अमोल बापू शिंदे यांनी जिल्हा प्रमुखांच्या खुर्चीवर बसवले.
वर्षा बंगल्याचं खानपानाचं बिल २ कोटी ३८ लाख, चहात सोन्याचं पाणी घातलं होतं काय?