निलंगा: महाराष्ट्र विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते तथा शिवसेना नेते आमदार अंबादास दानवे यांचा निलंगा शिवसेना युवा सेनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सत्कार करण्यात आला.
महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते तथा शिवसेना नेते आ.अंबादास दानवे हे आज लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते त्यावेळेस निलंगा येथे शिवसेना व युवा सेनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात सत्कार करण्यात आला व हासोरी या गावांमध्ये भूकंपग्रस्त लोकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या व त्या अडचणी सोडवण्याचे ग्रामस्थांना आश्वासन दिले. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शिवाजी माने, महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती संतोष सोमवंशी, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख विनोद अण्णा आर्य, हरिभाऊ सगरे, निलंगा विधानसभा प्रमुख शिवाजी पांढरे, शहर प्रमुख सुनील नाईकवाडे, युवासेनेचे जिल्हाप्रमुख दिनेश जावळे, युवासेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रा.आण्णासाहेब मिरगाळे,तालुकाप्रमुख प्रशांत वांजरवाडे, व्यापारी आघाडी तालुकाप्रमुख प्रसाद मठपती, महिला तालुकाप्रमुख रेखाताई पुजारी, शहर प्रमुख दैवता सगर, उपतालुकाप्रमुख मुस्तफा शेख, माधव नाईकवाडे, अल्पसंख्यांक तालुकाप्रमुख लायक पाशा शेख, अडत व्यापारी प्रमुख मोरे, संभाजी ब्रिगेडचे तालुकाअध्यक्ष प्रमोद कदम, वंचितचे तालुकाप्रमुख सुनील सूर्यवंशी,शुभम डांगे इत्यादी पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.
https://jantaexpress.co.in/?p=4237