कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे
जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
- जुनी पेन्शन योजना, पदोन्नतीतील आरक्षण आदी मागण्यांचा समावेश.
- महासंघास विविध संघटनांचा पाठिंबा.
लातूर: कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष कृष्णा इंगळे यांनी शासनाकडे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी वारंवार मागणी करूनही ते सोडवीले जात नाहीत. यासाठी राज्यातील मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पदोन्नती देण्यात यावी व 2005 नंतरच्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी यासह व इतर मागण्यांसाठी कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे राज्य अध्यक्ष कृष्णा इंगळे, कार्याध्यक्ष गणेश मडावी, वरिष्ठ उपाध्यक्ष सुमित भूईगळ यांच्या आदेशानूसार ‘लोकशाही की पेशवाई’ या सदराखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे, आंदोलन करण्यात येऊन याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी, लातूर यांना कास्ट्राईब कर्मचारी महासंघाच्या वतीने देण्यात आले.
यावेळी कास्ट्राईब कर्मचारी महासंघ, लातूरचे जिल्हा अध्यक्ष नितीन बनसोडे, सचिव गणेश राठोड, कोषाध्यक्ष प्रशांत म्हेत्रे, जिल्हा संघटक अशोक माळगे, ज्येष्ठ कार्यकर्ते नागरत्न कांबळे यांच्यासह जिल्हा कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे सुभाष मस्के, राहूल गायकवाड, राजकुमार गुंजरगे, संजय राऊत, कास्ट्राईब महसूल कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय सूर्यवंशी,गुरुदत्त सूर्यवंशी, शरद पुणे, गणेश वेडीगुटी, सतीश इबितवार जिल्हा परिषद कास्ट्राईब कर्मचारी संघटनेचे सुधीर बोकेफोडे, सदाशिव नवले, ओंकार वंजारे, कविता तांबारे, वन विभाग कर्मचारी संघटनेचे गोविंद घुले, विनोद पाटील, आयटीआयचे प्रसाद पवार, शिला उघाडे व वनमाला उघाडे यांची उपस्थिती होती.
या धरणे आंदोलनास राज्य सरकारी कर्मचारी मध्यवती संघटनेचे निमंत्रक संजय कलशेट्टी, महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना लातूर जिल्हा राज्य सहसचिव अरविंद पुलगुर्ले, जिल्हाध्यक्ष तानाजी सोमवंशी, तलाठी संघटनेचे महेश हिप्परगे, ग्रामसेवक संघटनेचे अनंत सूर्यवंशी यांनी पूर्ण वेळ उपस्थित राहून जाहिर पाठिंबा दिला.
यावेळी सुभाष मस्के, अशोक माळगे, राहुल गायकवाड, ओंकार वंजारे, पी,एस.नरसिंगे, विशाल जोगदंड, दत्तात्रय सूर्यवंशी यांची आंदोलनामागील रुपरेषा सांगून धरणे आंदोलन किती महत्त्वाचे आहे. याबाबतचे मार्गदर्शनपर भाषणे झाली.
कास्ट्राईब कर्मचारी महासंघ, कास्ट्राईब महसूल कर्मचारी संघटना, जिल्हा परिषद कर्मचारी संघटना, कास्ट्राईब वनविभाग कर्मचारी संघटना, कास्ट्राईब तलाठी कर्मचारी संघटना, कास्ट्राईब शिक्षक संघटना, कास्ट्राईब आयटीआय संघटना, जलसंपदा संघटना, माहिती व जनसंपर्क कर्मचारी संघटना यासह तालुकास्तरीय संघटनांनी सहभाग घेऊन धरणे व आंदोलन यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.