राज्याच्या सत्तासंघर्षात आज तिसऱ्या दिवशी सुनावणी होणार आहे. आजही ठाकरे गटाचा युक्तीवाद सुरू राहील अशी शक्यता आहे. सुप्रीम कोर्टाच्या हंगामी आदेशामुळे झालेली चूक घटनापीठाने दुरूस्त करावी अशी मागणी ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी केली. तसंच 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा उपाध्यक्ष झिरवळ यांच्याकडे सोपवला जाऊ शकतो असंही सिब्बल म्हणाले. ठाकरे गटाकडून युक्तिवाद सुरु करण्यात आला आहे. रेबिया प्रकरण, पक्षांतरबंदी कायद्याचा फेरविचार व्हावा, ठाकरे गटाची मागणी तसेच काल शिंदे गटाकडून युक्तीवाद तसेच बाजू मांडली आहे. अरुणाचल प्रदेशातील नबाम रेबिया प्रकरण, पक्षांतर बंदी कायदा याबाबत सात न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर फेरविचार व्हावा, अशी मागणी त्यांनी केली. तसेच बहुमत चाचणीला सामोरे न जाता तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार तेव्हा कोसळले याकडे न्यायालयाचे लक्ष वेधले. आता गुरुवारी पुन्हा सुनावणी सुरु झाली आहे.
महाराष्ट्र सत्तासंघर्षाची आजची सुनावणी संपली, आता मंगळवारी अभिषेक मनू सिंघवी हे ठाकरे गटाची बाजू मांडणारआहेत. सर्वोच्च नायालयात युक्तिवाद करताना अभिषेक मनू सिंघवी यांनी नबाम राबिया प्रकरणाचा दाखला दिला आहे. नबाम राबिया प्रकरणातही न्यायालयाने जवळपास 8 महिन्यांपूर्वीची परिस्थिती ग्राह्य धरुन त्यानुसार निकाल दिला होता, असं म्हणत सिंघवी यांनी महाराष्ट्राच्या प्रकरणातही त्याच प्रकारे न्यायालयाने विचार करावा, असा युक्तिवाद केला.
नेमकं काय घडलं न्यायालयात?
Uddhav Thackeray vs Eknath Shinde Updates Shiv Sena Case Hearing : ठाकरे गटाकडून युक्तिवाद करताना अभिषेक मनू सिंघवी यांनी 29 आणि 30 जून रोजी घडलेल्या घटनाक्रमाचा उल्लेख केला. अपात्रतेची टांगती तलवार असणाऱ्या आमदारांचाही मुद्दा सिंघवी यांनी उपस्थित केला. 29 जून रोजी सर्वोच्च न्यायालयाने विश्वासदर्शक ठराव सभागृहात मांडण्याला परवानगी दिली. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देत असल्याचं जाहीर केले. या घटनाक्रमावर सिंघवी यांनी न्यायालयाला अवगत केलं.
उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यावर सरन्यायाधीश यांनी व्यक्त केलं मत…
Uddhav Thackeray vs Eknath Shinde Updates Shiv Sena Case Hearing : ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी जवळपास अडीच दिवस ठाकरे गटाची बाजू मांडली. त्यानंतर अभिषेक मनू सिंघवी हे सध्या ठाकरे गटाची बाजू सर्वोच्च न्यायालयात मांडत आहेत. कपिल सिब्बल यांनी शिंदेंची बंडखोरी, बहुमताचा दावा ते थेट एकनाथ शिंदेंचा शपथविधी इथपर्यंतच्या घटनाक्रमाचा उल्लेख करून त्याबाबत सविस्तर भूमिका मांडली. सिंघवी यांनी बाजू मांडताना बहुमत चाचणी आणि आमदारांची अपात्रता या मुद्द्यावर भूमिका मांडली. त्यावेळी बहुमत चाचणीला उद्धव ठाकरे सामोरे गेले असते, तर परिस्थिती वेगळी असू शकली असती असे मत कोर्टाने व्यक्त केले आहे
‘राज्यपालांनी घटनेची पायमल्ली केली’
Uddhav Thackeray vs Eknath Shinde LIVE Updates : सत्तासंघर्षाच्या तिस-या दिवशी राज्यपालांच्या भूमिकेवर ठाकरे गटाने जोरदार युक्तिवाद केला. राज्यपालांनी अधिकार बाहेर जात शिंदेंना शपथ दिली आणि सरकार पाडलं असा युक्तिवाद ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी केला. तर राज्यपालांनी घटनेची पायमल्ली केली. राज्यपालांच्या अधिकाराबाबत दहाव्या सूचीचा विचार व्हावा असं ठाकरे गटाचे दुसरे वकील अभिषेक मनुसिंघवी यांनी म्हटले आहे
राज्यपालानी स्वत:चे अधिकार वापरुन आघाडी सरकार पाडले, ठाकरे गटाकडून मोठा युक्तिवाद
Uddhav Thackeray vs Eknath Shinde Updates Shiv Sena Case Hearing : राज्यपालांच्या अधिकाराविषयी काल जिथे थांबलो, तिथेच सुरुवात होत आहे. राज्यपालांनी एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपदासाठी निमंत्रण देणे हेच मूळात कायद्याचे उल्लंघन आहे.
त्यामुळे राज्यपालानी स्वत:चे अधिकार वापरुन हे सरकार पाडलं. शिवसेनेच्या नेत्यांना न विचारात एकनाथ शिंदेंना निमंत्रण कसं काय दिलं?
भाजप आणि शिवसेनेच्या आमदारांनी जेव्हा राज्यपालांना सांगितले की आमचा नेतृत्वावर विश्वास नाही. तेव्हा राज्यपालांनी शिवसेनेचे आमदार फुटले असं मान्य केले. त्यामुळेच बहुमत चाचणी करण्यास सांगण्यात आले. पण राज्यपालांना पक्ष फुटलाय की नाही हे मान्य करण्याचे अधिकारच नाही. त्यामुळे हे राज्यपालांनी केलेल्या कृत्यावर जरी निकाल दिला तरी सगळ्या प्रकरणाचा निकाल लागेल.