• Fri. Aug 8th, 2025

नवाब मलिकांचा कोठडीतील मुक्काम वाढला:पुन्हा 14 दिवसांची वाढ; मागच्या वर्षी फेब्रुवारीमध्ये झाली होती अटक

Byjantaadmin

Feb 22, 2023

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंधित मनी लॉण्डरिंग प्रकरणात ईडीने माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना मागच्या वर्षी फेब्रुवारीमध्ये अटक केली होती. त्यांच्या जामिन अर्जावर आज सुनावणी झाली असून त्यांच्या कोठढीत 14 दिवसांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे त्याचा जेलमधील मुक्काम वाढला आहे. माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना मागच्या वर्षी फेब्रुवारीमध्ये अटक झाली होती. त्यांनतर आतापर्यंत त्यांनी अनेकदा जामिन मिळविण्यासाठी अर्ज दाखल केले. मात्र, त्यांना जामिन मंजूर करण्यात आला नाही. आजही कोर्टाने त्यांच्या कोठडीत 14 दिवसांची वाढ केली आहे.

नेमके प्रकरण काय?

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नोव्हेंबर 2021 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री नवाब मलिकांवर गंभीर आरोप केले होते. फडणवीस म्हणाले होते की, मलिकांच्या कंपनीने अशा लोकांकडून जमीन खरेदी केली आहे, जे 1993 च्या मुंबई ब्लास्टमध्ये आरोपी आहेत. ही जमीन दाऊद इब्राहिमशी संबंधीत आहे. तसेच नवाब मलिकचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. त्यानंतर ईडीने मनी लाँड्रींगप्रकरणीही नवाब मलिकांवर गुन्हे दाखल करत त्यांची कोट्यवधींची संपत्ती जप्त केली आहे.

मलिकांची ही संपत्ती ईडीकडून जप्त

  • कुर्ल्यातील गोवावाला कंम्पाऊंड जप्त
  • कुर्ला पश्चिमेतील व्यावसायिक जागा ईडीकडून जप्त
  • उस्मानाबादमधील मलिकांची 148 एकर जमीन जप्त
  • कुर्ला पश्चिमेतील 3 फ्लॅट्स जप्त
  • वांद्रे पश्चिमेतील 2 राहती घरंही ईडीकडून जप्त

नवाब मलिकांची एक किडनी निकामी

मलिकांच्या वकीलांनी याआधीच्या सुनावणी दरम्यान सांगितले की, नवाब मलिकांची एक किडनी निकामी झाली आहे. त्यामुळे ते सध्या एकाच किडनीवर आहेत. तरीही रुग्णालयातून त्यांना डिस्चार्ज देण्यात यावा. कुर्ला येथील क्रिटी केअर रूग्णालयामध्ये नवाब मलिक हे गेल्या अनेक महिन्यांपासून दाखल आहेत. किडनी ट्रान्सप्लांटसाठी त्यांना अन्य मोठ्या रूग्णालयात उपचार सुरू करायचे आहेत, अशी माहितीही अनिल देसाई यांनी हायकोर्टाला दिली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *