• Fri. Aug 8th, 2025

50-50 खोके घेणाऱ्यांनी स्टंटची भाषा आम्हाला शिकवू नये- राजू शेट्टी

Byjantaadmin

Feb 22, 2023

शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवरून करत असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या चक्काजाम आंदोलनाला उद्योग UDHAY SAMAT माजी खासदार (Raju Shetti) यांनी कडाडून हल्लाबोल केला आहे. 50-50 खोके घेणाऱ्यांनी स्टंटची भाषा आम्हाला शिकवू नये, अशा शब्दात राजू शेट्टी यांनी सामतांना प्रत्युत्तर दिले आहे. उदय सामंत राजू शेट्टी यांचे आंदोलन सरकारला बदनाम करण्यासाठी असल्याची टीका केली होती. स्टंट कोण करतंय? हे लवकरच दाखवू, असा इशाराही त्यांनी दिला.

वाभिमानीकडून राज्यव्यापी चक्काजाम

दरम्यान, आज (22 फेब्रुवारी) स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून (Swabhimani Shetkari Sanghatana Agitation) राज्यव्यापी चक्काजाम आंदोलन करण्यात आले. राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात अंकलीत आंदोलन करण्यात आले. प्रोत्साहनपर पन्नास हजार अनुदान ताबडतोब शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करावे, थकीत वीज बिलापोटी महावितरण कंपनी शेतकऱ्यांच्या विजेचे कनेक्शन तोडत आहे, उन्हाळ्यामध्ये पाण्याची टंचाई असताना विजेचे कनेक्शन तोडल्याने शेतकऱ्यांची पिके करपून जात आहेत, त्यामुळे वीज कनेक्शन तोडू नयेत आदी मागण्या चक्काजाम आंदोलनातून करण्यात आल्या. तसेच, कृषी संजीवनी योजनेला 31 मार्चपर्यंत मुदतवाढ देऊन 50 टक्के पेक्षा कमी बिल घ्यावे, सोयाबीन, कपाशी, कांदा, द्राक्षे यासह अनेक पिकांचे बाजारभाव पूर्ववत करावेत यासह प्रमुख मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *