महानगरपालिके मार्फत शहरातील उर्वरित फेरीवाले याच्या सर्वेक्षणास सुरुवात –आयुक्त बाबासाहेब मनोहरे
लातूर – लातूर शहर महानगरपालिका लातूर अंतर्गत दीनदयाळ अंत्योदय योजना – राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत फेरीवाल्यांना सहाय्य या घटकामध्ये लातूर शहरामध्ये यापूर्वी २९७६ लाभार्त्यांचे पथविक्रेता सर्वेक्षण करण्यातआलेलेआहे. फेरीवाले म्हणजे कोण तर शहरामध्ये पक्क्या संसाधनाशिवाय परंतु सार्वजनिक,खाजगी जमिनीवर एखाद्या तात्पुरत्या स्थिर संरचनेच्या आधारे किवा फिरत्या गाडीच्या आधारे किवा डोक्यावर भार वाहून फेरीने वस्तूची विक्री करणारी किवा सेवादेणारी अशा व्यक्ती या सर्वेक्षणामध्ये सहभाग घेऊ शकतात. शहरात मोठ्या प्रमाणात फेरीवाले यांचे सर्वेक्षण शिल्लक असल्याचे निदर्शनास आल्यामुळे शहरात प्रत्यक्षात सर्वेक्षणास सुरवात केलेली आहे. सदर सर्वेक्षण २८ फेब्रुवारी२०२३ पर्येंत चालणार आहे. तरी ज्या पथविक्रेत्यांचे सर्वेक्षण झालेले नाही अशा पथविक्रेते यांनी सर्वेक्षण करून घ्यावे असे आवाहन लातूर शहर महानगरपालिकाचे आयुक्त श्री बाबासाहेब मनोहरे, उपायुक्त वीणा पवार यांनी केलेले आहे. ज्या फेरीवाले यांचे या पूर्वी सर्वेक्षण झालेले असेल तर त्या फेरीवाले यांनी या सर्वेक्षणामध्ये सहभाग घेऊ नये. सदर फेरीवाले यांनी ज्या ठिकाणी आपला व्यवसाय करत आहेत त्याच ठिकाणी थांबणे आवश्यक आहे.फेरीवाला सर्वेक्षण हे पूर्णपणे मोफत आहे सर्वेक्षणास कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. सर्वेक्षणाच्या वेळी आपले स्वतःचे आधार कार्ड व मोबाईल सोबत ठेवावे लागेल. या बाबत अधिक माहितीसाठी लातूर शहर महानगरपालिका लातूर येथे चंद्रकांत तोडकर, शहर अभियान व्यवस्थापक, दालन क्र.११ येथे संपर्क साधावा व या सर्वेक्षणात मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवावा असे आवाहन लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीने केलेले आहे.