• Fri. Aug 8th, 2025

राज्यसेवा परीक्षेतील बदल २०२५ पासून लागू करण्याच्या मागणीसाठी पुण्यात २४ तासांपासून विद्यार्थ्यांचे ठिय्या आंदोलन सुरू

Byjantaadmin

Feb 21, 2023
Students have been protesting for 24 hours in Pune

राज्यसेवा परीक्षेतील बदल २०२५ पासून लागू करण्याच्या मागणीसाठी पुण्यात २४ तासापासून विद्यार्थ्यांचे ठिय्या आंदोलन सुरू

राज्यसेवा परीक्षेतील बदल २०२५ पासून लागू करण्याच्या मागणीसाठी पुण्यातील जंगली महाराज रस्त्यावरील झाशीची राणी चौक येथे मागील २४ तासापासून आंदोलन सुरू आहे. आश्वासन नको अंमलबजावणी हवी, अशी भूमिका घेत आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनाच्या ठिकाणी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, भाजपचे आमदार अभिमन्यू पवार,प्रवक्ते अतुल लोंढे यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला. जोपर्यंत आयोग निर्णय घेत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलनाच्या ठिकाणावरून हटणार नसल्याचा पावित्रा विद्यार्थ्यांनी घेतला आहे.

“आम्ही महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला पत्र दिलेलं आहे की नवीन अभ्यासक्रम २०२५ पासून लागू करावा.विद्यार्थ्यांची जी भुमिका आहे त्याला सरकारचा पाठिंबा आहे” अशी भूमिका काल pune bदौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्री यांनी स्पष्ट केली होती. तरी देखील विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरु असून आंदोलनाच्या ठिकाणावरून हटणार नसल्याच्या भूमिकेवर ते ठाम आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *