भाजप – शिवसेनेचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे. यापूर्वीही शिवसेनेला योग्य प्रतिनिधित्व देण्यात आले होते. त्यानंतर आताही त्यांना योग्य प्रतिनिधित्व दिले जाईल. वेळ येताच जागा वाटपाचा फॉर्म्युला जाहीर केला जाईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
शिवसेना पक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ताब्यात आला आहे. यानंतर आता निवडणूक होऊ शकते. यामुळे भाजप आणि शिवसेनेच्या युतीमध्ये जागावाटपाबद्दलची चर्चा सुरू झाली आहे. मात्र केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्रातील सर्व जागा पंतप्रधान मोदींच्या पारड्यात टाकू असे कोल्हापुरात म्हटले होते. यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांनी जोर धरला होता. सर्व जागा भाजपने जिंकल्या तर शिवसेनेच्या वाट्याला काय येणार अशी चर्चा सुरू झाली होती.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले की, शिवसेना आणि भाजपमधील जागावाटपबाबत काही संभ्रम तयार करायचा नाही. याआधी शिवसेनेला योग्या प्रतिनिधित्व मिळाले, तर यापुढेही मिळणार आहे. जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला असून योग्य वेळी तो जाहीर करू असे फडणवीसांनी म्हटले आहे.
अमित शहा म्हणाले की, जेव्हा जेव्हा मी कोल्हापूरच्या महालक्ष्मीचे दर्शन घेतले तेव्हा तेव्हा भाजपला यश मिळालेले आहे. असे म्हणत अमित शहा यांनी आगामी निवडणुका भाजप आणि शिवसेना एकत्रित लढणार असल्याची घोषणा कोल्हापूरात केली. यावेळी त्यांनी ‘मिशन इलेक्शन’ला अप्रत्यक्षपणे सुरुवात करत असल्याचे सांगितले.
भाजपचा विजय नक्की
2024 मध्ये भाजपचा विजय नक्की होणार, असा विश्वास अमित शहा यांनी व्यक्त केला. पुढे शहा म्हणाले, दहशतवादावर लढण्याची काँग्रेसच्या काळात कोणामध्ये हिम्मत नव्हती. काँग्रेस सरकारमध्ये पंतप्रधानांना कुणी विचारत नव्हते. या 9 वर्षांच्या कालावधीत 9 करोड गरिब महिलांना गॅस सिलिंडर मिळाले. 70 वर्षांनंतर धूरमुक्त वातावरणात त्या महिला श्वास घेत आहेत