• Fri. Aug 8th, 2025

शिवसेनेवर तरुण कवीची कविता तुफान व्हायरल

Byjantaadmin

Feb 20, 2023

सुप्रीम कोर्टा तुम्हा विनवणी, ऐकाव्या वेदना, संविधानाच्या कलमामधला हा आयोग लावतोय चुना, चार चौघात केलाय गुन्हा… सांगा चोरली कुणी शिवसेना? हे गीत सध्या सोशल मीडीयावर व्हायरल झाले आहे. रत्नागिरीतील युवा कवी विकास लांबोरे यांनी हे गीत लिहिले असून गायले देखील आहे.

एकनाथ शिंदे यांना केंद्रीय निवडणूक आयोगाकडून 2 दिवसांपूर्वी मोठा दिलासा मिळाला आहे. शिवसेना या नावासह धनुष्यबाण हे चिन्ह निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांना दिले आहे. हा उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का मानला जात आहे. या निर्णयानंतर राजकीय गोटातून विविध स्वरुपाच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. राज्यातील जनसामान्यातून एक सहानूभुतीची लाट ठाकरेंच्या बाजूने आलेली पाहायला मिळत आहे.

उद्धव ठाकरे यांनी निवडणुक आयोगाचा निकाल आल्यानंतर दुसऱ्या दिवशी मुंबईतील कलानगर येथे ओपन जिपमधून कार्यकर्त्यांशी संवाद साधला. विशेष म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली तेव्हाही त्यांनी सुरुवातीच्या दिवसांमद्ये गाडीच्या टपावरुन भाषण केले होते. कार्यकर्त्यांची मोठी गर्दी याठिकाणी झाली होती. ठाकरेंबाबत महाराष्ट्रात सहानुभूती निर्माण झाली आहे.

सध्या घडणाऱ्या राजकीय घडामोडींवर सध्या सोशल मीडीयावर एक कविता तुफान व्हायरल होत आहे. शिवसेनेच्या सद्यस्थितीवरील कविता सादर करतानाचा व्हिडिओ तरुणाकडून सोशल मीडियावर अपलोड करण्यात आला. आणि माध्यमावर याला भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. लांजा येथील युवा कवी, लेखक विकास लांबोरे यांनी हे गाणे लिहिले आहे.

कोण आहे विकास लांबोरे?

विकास लांबोरे.
विकास लांबोरे.

विकास लांबोरे हे रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा येथील मूळ रहिवासी आहेत. सध्या विकास हे मुंबईत नोकरीनिमित्त वास्तव्यास आहेत. उत्तम कवी, लेखक, गायक अशी त्यांची ओळख निर्माण झाली आहे. याआधी देखील विकास लांबोरे यांनी लघुपट, गीते लिहिली आहेत. मात्र सद्यस्थितीवरील राजकारणावरील त्यांची कविता मोठ्या प्रमाणावर पाहिली जात आहे.

विकास लांबोरेची कविता

सुप्रीम कोर्टा तुम्हा विनवणी, ऐकाव्या वेदना
संविधानाच्या कलमामधला हा आयोग लावतोय चुना
चार चौघात केलाय गुन्हा… सांगा चोरली कुणी शिवसेना?

मराठी मुलखाचा अभिमान, शिवसेना अन् धनुष्यबाण
सत्तेचा हा माज कशाला.. विचारी जनता जनार्दन
सत्ताधाऱ्यांनो बाळगा लाज, जाणा लोकवेदना
चार चौघात केलाय गुन्हा, सांगा चोरली कुणी शिवसेना?

याची डोळा, याची देही, फोफावली ही हुकुमशाही
म्हणे जगात सर्वात मोठी, भारतात या लोकशाही
सरन्यायाधीश तुम्हा साकडं, वाचवा हो संविधाना
चार चौघात केलाय गुन्हा, सांगा चोरली कुणी शिवसेना?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *