कर्नाटकातल्या दोन उच्चपदस्थ नोकरशहांमधील खासगी वाद आता चव्हाट्यावर आला आहे. आयपीएस अधिकारी डी. रुपा मौदगिल यांनी आयएएस अधिकारी रोहिणी सिंधुरी यांचे काही खासगी फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यामध्ये त्यांनी दावा केला आहे की, सिंधुरी यांनी तीन पुरूष अधिकाऱ्यांना हो फोटो पाठवले होते. रुपा यांनी सिंधुरी यांच्यावर रविवारी तब्बल १९ आरोप केले आहेत. यामध्ये भ्रष्टाचाराचा आरोप देखील आहे. सिंदुरी यांनी उत्तर देताना म्हटलं आहे की, रुपा मौदगिल केवळ त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत.
आयपीएस अधिकारी डी. रुपा मौदगिल आणि आयएएस अधिकारी रोहिणी सिंधुरी यांनी एकमेकींवर भ्रष्टाचार आणि आयपीएस अधिकाऱ्यांना खासगी फोटो पाठवले असल्याचे आरोप केले आहेत. सिंधुरी यांनी रविवारी एक प्रसिद्धीपत्रक जारी केलं. त्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की, रूपा त्यांच्याविरोधात खोटी आणि बदनामीकारक मोहीम चालवत आहेत. हीच त्यांची कार्यप्रणाली आहे. मी भारतीय दंडसंहितेच्या वेगवेगळ्या कलमांतर्गत त्यांच्याविरोधात तक्रार दाखल करणार आहे. त्यांनी मला बदनाम करण्यासाठी सोशल मीडियावरील फोटो आणि माझे व्हॅट्सअप स्टेटसचे स्क्रीनशॉट जमवले आहेत.