• Fri. Aug 8th, 2025

श्चिम महाराष्ट्रासारखी होणार उस्मानाबादची प्रगती विकासाभिमूख कामासाठी निधी कमी पडू देणार नाही – पालकमंत्री डॉ.तानाजी सावंत

Byjantaadmin

Feb 20, 2023

उस्मानाबाद,(जिमाका): उस्मानाबाद जिल्हयाचा विकास पश्चिम महाराष्ट्रासारखा करण्यास शासन कटीबध्द असून लवकरच उस्मानाबादची ख्याती एक विकसीत जिल्हा म्हणून होईल,तसेच विकासाभिमूख कामासाठी निधी कमी पडू देणार नाही असे प्रतिपादन सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण तथा जिल्हयाचे पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजी सावंत यांनी आज येथे केले.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त पालकमंत्र्यांच्या हस्ते शिवाजी चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळयाचे अभिषेक व हेलीकॉप्टरव्दारे पुष्पवृष्टी कार्यक्रमाप्रंसंगी ते बोलत होते.

यावेळी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आ. राणाजगजितसिंह पाटील,आ.कैलास पाटील, जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे, जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी आणि मध्यवर्ती शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष धनंजय राऊत आदी उपस्थित होते.

डॉ.सावंत म्हणाले महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सवा निमित्त मी आपणास सांगु इच्छितोकी उस्मानाबाद जिल्हयाच्या सर्वांगीण विकासासाठी मी कटीबध्द असून जिल्हयास निधीची कमरता पडू देणार नाही,तसेच महाराष्ट्र शासनही उस्मानाबादच्या प्रगतीसाठी सकारात्मक असल्याचेही ते म्हणाले.

या अभिषेक व पुष्पवृष्टी सोहळयास शहर भरातून शिवप्रेमींनी गर्दी केली होती.मोटार सायकल रॅली,ऑटो रिक्षा रॅली आणि पारंपारिक नृत्यही यावेळी सादर करण्यात आले या प्रसंगी सर्व वयोगटातील नागरिक, महिला,मुले मोठया संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *