शेतकरी पीकविमा क्रांती आंदोलनचा दणका, ५२ हजार ९९५ शेतकर्यांना ३४ कोटी ६४ लाख पीकविमा वाटप सुरू
उर्वरित वंचित शेतकर्यांसाठी आंदोलन तीव्र करणार सचिन दाने यांचा पत्रकार परिषदेत सरकारला इशारा
लातूर – पिकविमा कंपनीच्या जटील अटी, बोगस पंचनामे, शेतकर्यांची लूट यातून लातूर जिल्हतील लाखो शेतकरी पिकविम्याच्या लाभापासनू वंचित आहेत. अशा सर्व शेतकर्यांना पिकविम्याचा प्रश्न येत्या विधीमंडळाच्या अधिवेशनात सर्व आमदारांनी लावून धरून शेतकर्यांच्या खात्यावर पिकविम्याची रक्कम जमा करण्यात यावी, अन्यथा शेतकरी पिकविमा क्रांती आंदोलनाच्यावतीने येत्या काळात आंदोलन तीव्र करणार असल्याचा इशारा शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख तथा क्रांती आंदोलनाचे प्रणेते सचिन दाने यांनी आज १७ फेबु्रवारी रोजी पत्रकार भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत राज्य व केंद्र सरकारला दिला आहे.
पिकविम्यापासून वंचित असलेल्या शेतकर्यांना पिकविमा मिळावा, यासाठी सचिन दाने आणि त्यांचे सहकारी मागील ४ महिन्यापासून लढा देत आहेत.अनेक आंदोलने, रस्ता रोको, ठिय्या आंदोलन, हलगी आंदोलन, आमरण उपोषण करण्यात आल. ेसचिन दाने यांनी लातूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर २१ जानेवारीला आमरण उपोषण केले होते. या उपोषण आंदोलनाच्या रेटयाने ११ फेबु्रवारी ते आजपर्यंत ५२ हजार ९९६ शेतकर्यांना ३४ कोटी ६४ लाख पीकविमा वाटप सुरू झालेले आहे. ११ फेब्रुवारी पासून पैसे पडायला चालू झाल्यामुळे १९ फेब्रुवारी चे आंदोलन तात्पुरते स्थगित करत आहोत.असे दाने यांनी सांगितले. पिकविमा कंपन्यांनी आतापर्यंत जिल्ह्यातील साधारण जवळ जवळ अडीच लाख शेतकर्यांनाच पिकविमा वितरित केलेला आहे. उर्वरित शेतकरी या लाभापासून अजूनही वंचित आहेत.उर्वरित शेतकऱ्यांना सरसकट अनुदान मिळावे यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची भेट घेऊन मागणी करण्यात येईल. शेतकर्यांना न्याय मिळवून देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज जयंती दिनी “शेतकरी क्रांती आंदोलन” या अराजकीय मंचाची स्थापना करण्यात येणार अशी घोषणा केली, व गावनिहाय समिती स्थापन करून शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले जाणार आहेत आणि त्याद्वारे आंदोलन तीव्र करण्यात येणार आहे. असे सांगून सचिन दाने म्हणाले, ग्रामपंचायत, सर्व आमदार, खासदार, संघटना यांच्याशी पत्रव्यावहार करून शेतकर्यांच्या पिकविम्याच्या जटिल प्रश्न सोडवण्यासाठी पाठपुरावा केला जाणार आहे. विधानसभेत,लोकसभेत यावर चर्चा होवून तोडगा निघावा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा सचिन दाने यांनी दिला आहे. शेतकर्यांनी अन्याय सहन न करता , जात पात, धर्म,पक्ष बाजूला सारून एकजुटीने आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे व शेतकरी क्रांती आंदोलनात सक्रिय होऊन शेतकर्यांसाठी कार्य करावे असे आवाहन दाने यांनी यावेळी केले.
शेतकरी पीकविमा क्रांती आंदोलन ला पाठिंबा देणारे लोकप्रतिनिधी, विविध पक्ष,विविध संघटना, तरुण युवक,शेतकरी, पत्रकार, पोलीस प्रशासन या सर्वांचे जाहीर आभार मानले गेले.शेतकरी आंदोलनादरम्यान दाखल केलेले खोटे गुन्हे वापस घ्यावेत, व.खोटे गुन्हे दाखल करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी मुख्यमंत्र्यांना केली आहे. लवकरच गावनिहाय दौरा करून माहिती संकलन केली जाईल सर्व शेतकऱ्यांच्या एकजुटीमुळे हे आंदोलन यशस्वी झाले. या पत्रकार परिषदेला सुधाकर गरड, पाशाभाई शेख, मलिकार्जुन हलकंचे, गोपाळराव पवार, परमेश्वर माने, नितीन औसेकर, धनंजय भोसले, स्वप्नील कासगुडे, कृष्णा औसेकर, भाऊसाहेब माने, जनार्दन पाटील,मुबिन शेख, विकास पवार, भगवान शिंदे सह आदींची प्रमुख उपस्थिती होती.
