• Mon. Aug 18th, 2025

लातूरचे भाजप खासदार सुधाकर श्रृंगारेआणि काँग्रेसचे आमदार अमित देशमुख हे पहिल्यांदाच जाहीर कार्यक्रमात एकाच मंचावर

Byjantaadmin

Feb 16, 2023

लातूर  – लातूरचे राजकारण कायमच देशमुख कुटुंबीय यांच्या अवतीभोवती फिरत असते. सत्ता कोणाचीही असो. देशमुख कायम चर्चेत असतात. लातूरचे भाजप खासदार सुधाकर श्रृंगारे  आणि लातूर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार अमित देशमुख  हे पहिल्यांदाच जाहीर कार्यक्रमात एकाच मंचावर आले होते. सोबत औसाचे भाजप आमदार अभिमन्यू पवार हेही होते. लातूरच्या ज्येष्ठ खासदार सुधाकर श्रृंगारे  यांनी एका कार्यक्रमात माजी मंत्री तथा काँग्रेसचे तरुण आमदार अमित देशमुख यांचा आशीर्वाद मागितला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात आता चर्चेला उधाण आले आहे.

लातूर येथे महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र व्हॉलीबॉल संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तर व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन लातूर येथे करण्यात आले आहे. तीन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेतील काल उद्घाटनाचा दिवस होता. यावेळी हे तिन्ही नेते एका मंचावर आले होते. यावेळी भाजपचे खासदार यांनी केलेल्या भाषणात अमित देशमुख यांना किती महत्व आहे, याचा प्रत्यय आणून दिला. तुम्ही अभिमन्यू पवार यांच्यावर जसे प्रेम करत आहात तसे आमचयवर ही करावे, अशी आपली थेट इच्छा जाहीर भाषणात व्यक्त केली. त्यामुळे उपस्थितांच्या भुवया उंचावल्या. त्यांच्या या इच्छेनंतर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु झाली आहे.

देशात आणि राज्यात भाजपा आणि काँग्रेस या पक्षाचे सत्तेसाठी सत्ता संघर्ष आपण सर्वांनी पाहिला आहे. पण लातूरच्या राजकीय समीकरणात मात्र भाजपचे ज्येष्ठ खासदार सुधाकर शृंगारे यांना काँग्रेसचे आमदार अमित देशमुख यांचा आशीर्वाद पाहिजे. त्यामुळे भाजपाचे आमदार आणि खासदाराला काँग्रेसच्या देशमुखचा आशीर्वादाची गरज का निर्माण झाली आहे, असा प्रश्न सध्या राजकीय वर्तुळात उपस्थित केला जात आहे

काय म्हणाले खासदार सुधाकर शृंगारे

अमित भय्या जसे अभिमन्यू यांच्यावर आपले प्रेम आहे, तसे आमच्यावर थोडे प्रेम करा. आशीर्वाद असू द्या, आपली आणि माझी कधीच भेट झाली नाही एका मंचावर आपण पहिल्यांदा आलो आहोत. आपल्या समोर मी पहिल्याच बोलतोय, मनात भीती होती. भय्या कधी भाषणात चिमटे घेतील हे सांगता येत नाही. मात्र त्यांनी तसे काही केले नाही. मला चिमटे घेता येत नाही, असे व्यक्त होत भाषणात रंगत आणली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *