• Wed. May 7th, 2025

विलासराव देशमुख फाउंडेशनच्या वतीने बोरवटी येथे पूर्व कर्करोग निदान आरोग्य शिबिर संपन्न

Byjantaadmin

Feb 13, 2023

विलासराव देशमुख फाउंडेशनच्या वतीने बोरवटी
येथे पूर्व कर्करोग निदान आरोग्य शिबिर संपन्न

लातूर प्रतिनिधी : विलासराव देशमुख फाउंडेशनच्या वतीने बोरवटी येथे पूर्व कर्करोग निदान आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले, या शिबिरामध्ये महिलांना व पुरुषांना याविषयी जनजागृती व मोफत तपासणी करण्यात आली.
या आरोग्य शिबिरात डॉ. कल्याण बरमदे, डॉ. अजय पुनपाळे, डॉ.मनीषा बरमदे यांनी कर्करोग कसा होतो कर्करोगाचे दुष्परिणाम काय आहेत. कर्करोगाचे टप्पे कसे असतात, त्याचबरोबर कर्करोग  याविषयी सखोल असे मार्गदर्शन केले. त्याचबरोबर डॉ. मनीषा बरमदे यांनी कर्करोग होऊ नये यासाठी काय काळजी घ्यावी, त्याचबरोबर आपला आहार कसा असावा, महिलांनी आपल्या आरोग्याकडे कश्याप्रकारे लक्ष दिले पाहिजे याविषयीचे सखोल असे मार्गदर्शन  महिला व ग्रामस्थांना केले. विलासराव देशमुख फाउंडेशनच्या वतीने बोरवटी येथे आयोजित करण्यात आलेल्य शिबिरामध्ये  ३६ महिलांची व २७ पुरूषांची  कर्करोग  तपासणी आणि महिलांच्या आजारांविषयीची तपासणी मोफत करण्यात आली, त्यांना त्यांच्या आरोग्याची निगा कशी राखावी, काळजी कशी घ्यावी याविषयीचे मार्गदर्शन करण्यात आले. या शिबिराला विलासराव देशमुख फाउंडेशनच्या समन्वयक मोळवणे, डॉ. कल्याण बरमदे,  डॉ. अजय पुनपाळे, डॉ. मनीषा बरमदे, गावच्या सरपंच अनुजा  नाथजोगी, उपसरपंच अमोल माने, ग्रा.पं. सदस्य गणेश नाथजोगी, तंटामुक्ती अध्यक्ष ज्योतीराम लकडे, कमलाकर विडेकर, सुरेश ढमाले, संतोष पाटील, व्यंकट ढमाले, सतीश लकडे, अविनाश देशमुख, आशा स्वयंसेविका परीमला भोसले, शोभा धडे सोशल प्लॅनर गजानन बोयणे, मेघराज देशमुख  गावातील नागरिक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *