निलंगा :- निलंगा येथील साई क्रिटिकेअर हॉस्पिटल च्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त कोरोना काळात समाजसेवी वृत्तीने रुग्ण सेवा केलेल्या डॉक्टर, मेडिकल दुकानदार, कोरोनामृत्तांवर अंत्यसंस्कार करणारे, ॲम्ब्युलन्स चालक, आरोग्य कर्मचारी, ऑक्सीजन सिलेंडरचे पुरवठादार, समाजसेवक, माजी सैनिक यांचा रविवार दि. 2 ऑक्टोबर गांधी जयंती रोजी सत्कार करण्यात आला. यावेळी आयोजित आरोग्य शिबिरात विविध आजाराचे सुमारे 205 रुग्णांची तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी व्यापारी महासंघाचे अध्यक्ष प्रल्हाद बाहेती होते. आरोग्य शिबिराचे उदघाटन स्त्रीरोग तज्ञ डॉ. कल्याण बरमदे यांनी केले. याप्रसंगी डॉ. प्रमोद लोकरे, डॉ. ज्ञानेश्वर पांचाळ, डॉ. कृष्णदास कोतवाडे, डॉ. अतुल उरगुंडे, डॉ. अरविंद भातांब्रे, डॉ. राजशेखर मेनगुले, डॉ. वर्धा नांगरे आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना डॉ. कल्याण बरमदे म्हणाले, माफक दरात अत्याधुनिक आरोग्यसेवा व सुविधा उपलब्ध करून देणारे डॉ. अरविंद भातांब्रे यांचे साई क्रिटिकेअर हॉस्पिटल ही निलंग्याच्या वैभवात भर टाकणारे हॉस्पिटल आहे. प्रास्ताविक करताना डॉ. भातांब्रे म्हणाले, ग्रामीण भागातील रुग्णांची गरज लक्षात घेऊन एक वर्षांपूर्वी साई क्रिटिकेअर हॉस्पिटलची निलंगा येथे सुरुवात करण्यात आली आहे . डॉक्टर व रुग्ण यांच्यातील विश्वासाचे नाते अधिक दृढ करण्याचा आपला संकल्प असून या रुग्णालयातून कोणताही रुग्ण पैसा नाही म्हणून उपचाराशिवाय जाणार नाही अशी ग्वाही डॉ. भातांब्रे यांनी यावेळी दिली. याप्रसंगी कोरोना योध्दे उपजिल्हा रुग्णालयाचे तत्कालीन वैद्यकीय अधीक्षक डॉ. दिलीप सौंदळे, ओमप्रकाश बाहेती, बोराडे सिस्टर, जलील हुसेन बिराजदार, दत्ता धुमाळ, राम सगरे, अजय कांबळे, देविदास बेळकुंदे, रामदास गायकवाड, दिशा प्रतिष्ठानचे सोनू डगवाले, जब्बार पठाण आदींचा सत्कार करण्यात आला. यावेळी डॉक्टर्स, विविध पक्ष संघटनेचे पदाधिकारी, नागरिक व रुग्ण मोठ्या संख्येने उपस्थित होते.
—————————————-
ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत हॉस्पिटल सेवा…. .
आज वर्धापकाळामुळे अनेक ज्येष्ठ नागरिकांची वेळेवर उपचार न मिळाल्याने हाल होत असताना दिसून येते. म्हणून ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना साई क्रिटिकेअर हॉस्पिटलच्या वतीने कायम मोफत हॉस्पिटल सेवा देण्याची घोषणा डॉ.अरविंद भातांब्रे यांनी प्रथम वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात केली होती. त्या आवाहानाला रुग्णांकडून प्रतिसाद मिळाला असून आज सोमवार दि. ३ ऑक्टोबर रोजी ७८ वर्षाची एक वृद्ध महिला उपचारासाठी निलंगा येथील साईक्रिटिकेअर हॉस्पिटलमध्ये दाखल झाली आहे.
75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना साई क्रिटिकेअर हॉस्पिटलच्या वतीने कायम मोफत हॉस्पिटल सेवा – डॉ.अरविंद भातांब्रे
