• Sat. May 3rd, 2025

शशिकांत वारीशे यांच्या मृत्यूनंतर राज्यातील पत्रकार आक्रमक; सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी

Byjantaadmin

Feb 10, 2023
शशिकांत वारीशे यांच्या मृत्यूनंतर ठाण्यातील पत्रकार आक्रमक; शिंदे सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी फोटो – आरएनओ वृत्तसंस्था

मुंबई;-सोमवारी (६ फेब्रुवारी) मुंबई गोवा महामार्गावरील राजापूर येथे रत्नागिरीतील पत्रकार शशिकांत शंकर वारीशे (वय ४५ वर्षे, रा. कशेळी) यांचा अपघात झाला होता. या अपघातात ते गंभीर जखमी झाले होते. अपघातानंतर त्यांना कोल्हापूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, मंगळवारी (७ फेब्रुवारी) पहाटे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, अपघात नसून घातपात असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या प्रकरणी ठाण्यातील पत्रकार आक्रमक झाले असून आरोपीवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करत आज ठाण्यात पत्रकारांनी निदर्शने के

यासंदर्भात बोलताना ठाणे पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष संजय पितळे संताप व्यक्त केला. “राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारीसे यांचा अपघात हा अपघात नसून घातपात आहे. हे उघडच आहे. शशिकांतने ज्याच्या विरोधात बातमी प्रसिद्ध केली. तो कारचालक पंढरीनाथ आंबेरकर होते. सकाळी पंढरीनाथ आंबेरकर याच्या विरोधात बातमी लागते आणि त्याच व्यक्तीची कार वारीसे यांच्या गाडीला जोरदार धडक देते. त्यात वारिशे यांचा दुर्दैवी मृत्यू होतो. हा केवळ योगायोग नसून कट रचून केलेला हा खूनच आहे. या घटनेचा आम्ही राज्यातील सर्व पत्रकार तीव्र शब्दात निषेध करीत आहोत”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

आरोपीवर पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करून या घटल्याची सुनावणी जलदगती न्यायालयामार्फत व्हावी आणि राज्यात पत्रकार संरक्षण कायद्याची कठोर अंमलबजावणी व्हावी, अशी मागणीही त्यांनी केली.

राज्यातील अनेक  जिल्ह्यात आज पत्रकारानी आंदोलने केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *