कुडूंबले हॉस्पिटलच्या मोफत आरोग्य शिबिरास रुग्णांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
निलंगा:- माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या पूर्णाकृती पुतळा अनावरण कार्यक्रमाच्या निमित्ताने निलंगा येथील कुडूंबले हॉस्पिटलच्या वतीने आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबिरास रुग्णांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.या शिबिरात २२५ रुग्णांची ईसीजी, सीबीसी, रँडम शुगर टेस्ट, यूरिन टेस्ट, सोनोग्राफी या तपासण्या मोफत करण्यात आली.
कर्मयोगी डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या जयंतीदिनी गुरुवार दि.९ फेब्रुवारी रोजी त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण होणार आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने बुधवार दि८ फेब्रुवारी रोजी निलंगा येथील कुडूंबले हॉस्पिटलच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अशोकराव पाटील निलंगेकर यांच्या हस्ते या शिबीराचे उदघाटन करण्यात आले. यावेळी व्यापारी महासंघाचे अध्यक्ष प्रल्हाद बाहेती, उपाध्यक्ष शिवाजी रेशमे गुरुजी, ईश्वर पाटील, डॉ. एस. एस. पाटील, डॉ.बरुरे, डॉ. धनगे, डॉ. हातागळे, शिवप्रसाद मुळे, संतोष सोरडे, आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना अशोकराव पाटील म्हणाले की, निलंगेकर व कुडूंबले या दोन्ही परिवाराचे कौटुंबिक व जिव्हाळ्याचे स्नेह आहे. स्व. डॉ. एम. एन. कुडूंबले हे निलंगेकर परिवाराचे फॅमिली डॉक्टर होते. मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करुन कुडूंबले हॉस्पिटलने समाजहितासाठी मोठे योगदान दिले असल्याचे त्यांनी सांगितले. या शिबिरात डॉ. विक्रम कुडुंबले, डॉ प्रियंका कुडूंबले , डॉ. साईनाथ कुडूंबले, डॉ.सुधा कुडूंबले या तज्ञ डॉक्टरांनी उपस्थित रुग्णांची तपासणी करून उपचार केले. दरम्यान शिबिर चालू असताना माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर व भाजपा प्रदेश सचिव अरविंद पाटील निलंगेकर यांनी मोफत आरोग्य शिबिरास भेट देऊन शुभेच्छा दिल्या व कुडूंबले हॉस्पिटलच्या विधायक व सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले. या शिबिरात एकूण २२५ रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली. त्यात रुग्णांची ईसीजी ५१, सीबीसी ७२, शुगर टेस्ट १२८, युरीन टेस्ट ३६, सोनोग्राफी २५ मोफत करण्यात आली.