औराद शहाजानी येथील पुलाचे काम सुरू करण्याची मागणी
निलंगा(प्रतिनिधी) : लातूर- जहीराबाद महामार्गावरील औराद शहाजानी येथील महाराष्ट्र विद्यालयाजवळील पुलाचे काम तात्काळ सुरू करण्यात यावे. पुलाचे काम बंद असल्यामुळे रहदारीस अडथळा निर्माण होत आहे. या पुलावर मोठ्मोठे खड्डे पडले असून रस्ता खूपच अरुंद झाला आहे. गाडी चालवताना गाडीवरील ताबा सुटून रोज छोटे-मोठे अपघात होताना पाहावयास मिळत आहे. त्यामुळे पुलावरून लोकांना जीव मुठीत घेऊन चालावे लागत आहे. प्रशासनाने यात लक्ष घालून पुलाचे काम करणाऱ्या कंपनी ठेकेदारासह काम सुरू करण्याच्या सूचना द्याव्यात. या पुलाजवळ महाराष्ट्र विद्यालय असून विद्यार्थ्यांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. पुलाचे काम थांबल्यामुळे पाणी मोठ्या प्रमाणात थांबल्यामुळे डासांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना अनेक आजारांचा सामना करावा लागत आहे. संबंधित गुत्तेदार व ठेकेदारांनी सदरील पुलाचे काम तात्काळ सुरू नाही केल्यास येत्या आठ ते दहा दिवसांत गावकरी मंडळी, विद्यार्थी व छावा संघटनेच्या वतीने छावा स्टाईल आंदोलन करण्यात येईल असे छावा संघटनेचे मराठवाडा कार्याध्यक्ष भगवानदादा माकणे व तालुकाध्यक्ष दासभैया सोळंके यांनी उपविभागीय अधिकारी निलंगा यांना निवेदन दिले आहे.