आध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांच्या तुळजापूर मधील कार्यक्रमात संभाजी ब्रिगेडचा गोंधळ घातला आहे. रविशंकर यांच्यासमोर कार्यकर्त्यांची घोषणाबाजी केली. रामदास स्वामी नव्हे तर तुकाराम महाराज छत्रपती शिवरायांचे गुरु आहेत ,श्री श्री रविशंकर यांनी माफी मागावी, अशी मागणी देखील संभाजी ब्रिगेडने यावेळी केली आहे. आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. कार्यक्रम उधळण्याचा संभाजी ब्रिगेड ने इशारा दिला होता. त्यानंतर हा गोंधळ झाल्याचं पहायला मिळतंय.
श्री श्री रविशंकर यांनी शिवरायांची जाहीरपणे माफी मागावी अन्यथा नांदेडात होणारा त्यांचा कार्यक्रम उधळून लावू असा इशारा स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडने दिला होता. तसेच संपूर्ण शहरात बॅनरही लावण्यात आले होते. श्री श्री रविशंकर यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टवर छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यानंतर कार्यकर्त्यांनी कार्यक्रमात राडा केलाय.
जालना जिल्ह्यात शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आर्ट ऑफ लिव्हिंगचे श्री श्री रविशंकर पहिल्यांदाच एका व्यासपीठावर एकत्र दिसले. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी श्री श्री रविशंकर यांची स्तुती केली. जेव्हा आम्ही गुवाहाटीला होतो, तेव्हा श्री श्री रविशंकर यांनी मला फोन करुन आशीर्वाद दिला होता, असा गौप्यस्फोट देखील शिंदे यांनी यावेळी केला आहे.
दरम्यान, तो कार्यक्रम त्यावेळी झाला म्हणूनच आज हा कार्यक्रम पार पडतोय, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. श्री श्री रविशंकर यांनी सुरु केलेल्या जलतारा या जलसंधारणाच्या प्रकल्पाला आम्ही पाठिंबा देऊ, असं आश्वासन देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिलं होतं. त्यामुळे आता संभाजी ब्रिगेडचा आघात मुख्यमंत्री कोणत्या पद्धतीने घेतात, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.