अदानी एंटरप्रायझेस लिमिटेडने बुधवारी रात्री उशीरा 20 हजार कोटींचा पूर्णपणे सबस्क्राईब्ड एफपीओ रद्द केला आहे. गुंतवणुकदारांचा पैसा परत केला जाईल. या इक्विटी शेअर्सची फेस व्हॅल्यू एक रुपया आहे.
गौतम अदानींनी एफपीओ रद्द केल्यानंतर एक व्हिडिओ संदेश दिला. यात गुंतवणुकदारांचे आभार मानले. म्हटले, ‘गेल्या आठवड्यात स्कॉटकमध्ये झालेल्या चढ-उतारानंतरही कंपनीचा व्यवसाय आणि त्याच्या व्यवस्थापनातील आमच्याविषयीचा विश्वास आश्वासक आहे. माझ्यासाठी गुंतवणुकदारांचे हित सर्वोपरी आहे. बाकी सर्व दुय्यम आहे. म्हणून गुंतवणुकदारांना संभाव्य नुकसानीपासून वाचवण्यासाठी आम्ही एफपीओ मागे घेतला आहे.’
ते म्हणाले, ‘या निर्णयाचा आमचे विद्यमान ऑपरेशन्स आणि भविष्याच्या योजनांवर कोणताही परिणाम होणार नाही. आम्ही योजनांच्या कालबद्ध परिचालनाकडे लक्ष देऊ. बोर्डाला वाटले की एफपीओसह पुढे जाणे नैतिकदृष्ट्या योग्य ठरणार नाही. बाजारात स्थिरता आल्यावर आम्ही आमच्या भांडवली बाजार धोरणाचा आढावा घेऊ. आमचे ईएसजीवर विशेष लक्ष आहे. आमचा प्रत्येक व्यवसाय जबाबदारीने मूल्य निर्माण करत राहील.’
‘अदानी एंटरप्रायझेसने 1 फेब्रुवारीला झालेल्या बोर्डाच्या बैठकीत निर्णय घेतला की, आम्ही एफपीओ पुढे घेऊन जाणार नाही. आम्ही परिस्थिती आणि स्टॉकमधील चढ-उतार पाहता हा निर्णय घेतला आहे की ग्राहकांच्या हितासाठी एफपीओसह पुढे जाणार नाही आणि व्यवहार पूर्णपणे मागे घेतले जातील. आम्ही गुंतवणुकदारांचे एफपीओत सहभागी होण्यासाठी आभार मानतो. या एफपीओचे सबस्क्रिप्शन काल यशस्वीरित्या बंद झाले आहे.’
स्टॉक अस्थिर असूनही ही कंपनी, आमचा व्यवसाय आणि आमच्या व्यवस्थापनावरील विश्वासाबद्दल आम्ही तुमचे आभार मानतो. तथापि, आज बाजार अभूतपूर्व राहिला. आमच्या स्टॉकमध्ये दिवसभर चढ-उतार राहिला. अशी असामान्य स्थिती पाहता कंपनीच्या बोर्डाला वाटले की आता या एफपीओसह पुढे जाणे नैतिकतेच्या दृष्टीने योग्य ठरणार नाही. आमच्या गुंतवणुकदारांचे हित सर्वात पुढे आहे.
म्हणूनच भविष्यात होणाऱ्या कोणत्याही आर्थिक नुकसानीपासून त्यांना वाचवण्यासाठी बोर्डाने निश्चित केले आहे की या एफपीओसह पुढे जाणार नाही. आम्ही आमच्या लोकांना रिफंड देण्यासाठी आमच्या बूक रनिंग लीड मॅनेजर्ससह काम करत आहोत. आमचा ताळेबंद मजबूत आहे. आमचा कॅश फ्लो आणि संपत्ती सुरक्षित आहे. सोबतच कर्ज फेडण्याचा आमचा रेकॉर्ड चांगला राहिला आहे.
आमच्यासा या निर्णयाने आमचे सध्याचे परिचालन आणि भविष्यातील आमच्या योजनांवर कोणताही परिणाम होणार नाही. आम्ही दीर्घ कालावधीत मूल्य निर्मितीवर लक्ष केंद्रित करत राहू आणि आमचा विकास अंतर्गत वाढीच्या हिशोबाने व्यवस्थापित केली जाईल. बाजार जसा स्थिर होईल तसे आम्ही आमच्या भांडवली बाजार धोरणाचा आढावा घेऊ. आम्हाला पूर्ण विश्वास आहे की आम्हाला तुमचे सहकार्य मिळत राहील. आमच्यावर विश्वास ठेवण्यासाठी धन्यवाद.’
एफपीओ काय असतो
एफपीओ म्हणजेच फॉलो ऑन पब्लिक ऑफरिंग. ही कंपनीसाठी पैसा उभारण्याची एक पद्धत असते. जी कंपनी आधीच शेअर बाजारात लिस्टेड असते. ती गुंतवणूकदारांसाठी नवे शेअर ऑफर करते. हे बाजारातील शेअरपेक्षा वेगळे असतात. बहुतांश शेअर्स प्रमोटर्स जारी करतात. एफपीओचा वापर कंपनीच्या इक्विटी बेसमध्ये बदल करण्यासाठी असतो.