शारदीय नवरात्र उत्सव 2022 संगीत रजनी उत्साहात साजरी
निलंगा :-येथील राघवेंद्र स्वामी मठात शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त येथील पंडित शांताराम चीगरी संगीत अकादमीच्या विद्यार्थ्यांचा *संगीत रजनी* कार्यक्रम संपन्न झाला. यामध्ये सुरुवातीला वेदशास्त्र संपन्न वेणुगोपालाचार्य काशीकर व संगीत अकादमीचे संचालक श्री एकनाथ पांचाळ व श्री नंदकुमार मुनी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. सुरुवातीला अकादमीचे विद्यार्थी कु. सुखदा रामदासी, प्रणिता गोटे, कांचन सोळुंके, व स्वरांजली पांचाळ यांनी ‘ओंकार अनादी अनंत ‘ हे गीत गाऊन कार्यक्रमाची बहारदार सुरुवात केली. प्रेक्षकांच्या उदंड प्रतिसादात उत्तरोत्तर कार्यक्रम रंगत गेला. कु. प्रयुता मुनी हिने ‘माझी रेणुका माऊली’, सिद्धी पिंपळे हिने ‘कौशल्येचा राम’, चैत्राली तुबाजी हिने ‘खेळ मांडीयेला’ सुखदा रामदासी हिने ‘अपार हा भवसागर’ कांचन सोळुंके हिने ‘राधा कृष्णा वरी भाळली’ प्रणिता गोटे हिने ‘लल्लाटी भंडार’ आयुषी नाईक हिने ‘नवरात्रीला नव रूपे तू’ तनिष्का पाटील व तनया मोरे हिने ‘चांदणे शिंपीत जा ‘ असे गीते सादर केली.त्यांना तबला साथ आनंद रामदासी, दीपक धुमाळ, वेदांत पांचाळ, कृष्णा पांचाळ, आकाश पांचाळ, अवधूत मिरखलकर,रितेश बिराजदार यांनी केली. कार्यक्रमाच्या शेवटी संगीत अकादमीचे संचालक श्री एकनाथ पांचाळ यांच्या भाग्यदा लक्ष्मी बारम्मा या कनडा भजनाने कार्यक्रमाचा समारोप झाला. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी श्री नंदकुमार मुनी, सुधीर रामदासी, संजय पिंपळे, रामचंद्र नाईक,प्रमोद मुनी, राघवेंद्र तुबाजी,सौ दिपाली नाईक,सौ जान्हवी पिंपळे इत्यादी पालकांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ प्रज्ञा मुनी व सौ सुमेधा रामदासी यांनी केले.सौ प्रीती तुबाजी यांनी आभार प्रदर्शन केले.