• Tue. Apr 29th, 2025

नवभारताच्या निर्मितीसह सर्वसामान्यांच्या प्रगतीचा अर्थसंकल्प- माजी मत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर

Byjantaadmin

Feb 1, 2023

नवभारताच्या निर्मितीसह सर्वसामान्यांच्या प्रगतीचा अर्थसंकल्प- माजी मत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर

लातूर/प्रतिनिधी ः- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी मांडलेला अर्थसंकल्प म्हणजे नवभारताच्या निर्मितीसह सर्वसामान्यांच्या प्रगतीला वेग देणारा असल्याचे स्पष्ट होत आहे. समाजातील प्रत्येक घटकांसह विविध क्षेत्राला न्याय देणारा आणि त्यासाठी मोठ्या प्रमाणात तरतुद करणारा हा अर्थसंकल्प देशाच्या विकासाची सप्तपदी मांडणारा असल्याची प्रतिक्रिया माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी दिले आहे.
कोरोना महामारीनंतर जगभरात आर्थिक मंदीचे वातावरण असतानाही भारताच्या अर्थव्यवस्थेने तग धरत आता जगातील पाचवी अर्थव्यवस्था म्हणून ओळख निर्माण केली आहे. त्यामुळेच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी मांडलेला देशाचा अर्थसंकल्प जगातील सर्वांसाठीच दिशादर्शक असल्याचे सांगत माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी वंचीत घटकांना प्राधान्य, पायाभित सुविधा आणि गुंतवणुक, विकास, क्षमता विस्तार, हरित विकास, युवक व आर्थिक क्षेत्राचा विकास अशा सात प्रमुख मुद्दावर मांडला हा अर्थसंकल्प म्हणजे देशाच्या विकासाची सप्तपदी असल्याचे त्यांनी सांगितले. समाजातील प्रत्येक घटकांचा विचार करत या अर्थसंकल्पाच्या माध्यातून त्यांचा प्रगतीचा आणि विकासाचा विचार केला असल्याचे दिसून येते. विशेषतः शेतकर्‍यांसाठी या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून विविध योजनाची घोषणा करत त्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर होणार आहे. शेतीबरोबरच दुध, मत्स उत्पादन आणि पशुधन क्षेत्राचाही विकास होणार असल्याने शेतकर्‍यांना आर्थिक बळ मिळणार आहे. विशेषतः सहकार क्षेत्रासाठीही या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून विशेष विचार केलेला असून गाव पातळीपर्यंत सहकार मजबुत करण्यासाठी या अर्थसंकल्पाचा मोठा फायदा होणार आहे. युवक व विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी नवनवीन दालने खुली होणार असून, शिक्षण क्षेत्राच्या विकासासह रोजगार निर्मितीसाठी केलेल्या घोषणा भारताच्या उज्वल भविष्यासाठी महत्वाच्या ठरणार आहेत.
देशाच्या विकासात महत्वाची भुमिका पार पाडणार्‍या महिलांच्या सक्षमीकरणासाठी अनेक योजना सुरु होणार असून बचत गटाच्या माध्यामातून महिला सक्षमीकरणासाठी विशेष पाऊल उचलले जाणार आहे. ग्रामीण व शहरी अर्थव्यवस्थेतील दरी कमी करणारा हा अर्थसंकल्प समृद्ध, समर्थ व संपन्न भारत बनविणारा असल्याची प्रतिक्रिया माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed