• Tue. Apr 29th, 2025

रक्तदाता प्रेरक क्रिकेट टूर्नामेंट

Byjantaadmin

Jan 29, 2023

रक्तदाता प्रेरक क्रिकेट टूर्नामेंट

मुंबई:-मुंबईतील सर्व सार्वजनिक रूग्णालयांत रक्ताची गरज प्रचंड प्रमाणात भासत आहे, किंबहुना दिवसेंदिवस ती वाढतच जात आहे, परंतू त्या प्रमाणात लोक रक्तदानासाठी पुढे येत नाहीत. जास्तीत जास्त लोकांनी पुढे येऊन रक्त दान केलं तर रक्ताची टंचाई कधीही भासणार नाही. यासाठी मुंबईतील सर्व रूग्णालयांतील रक्त केंद्रांच्या समाज विकास अधिकारी यांनी एकत्र येऊन लोकांना रक्तदानाचं महत्त्व पटवून देण्यासाठी आणि लोकांमध्ये रक्तदानाविषयी जागृती निर्माण करण्यासाठी दिनांक ३० आणि ३१ जानेवारी २०२३ रोजी हिंदू जिमखाना, मरीन लाईन्स  येथे  सकाळी ९ ते सायंकाळी ५  या वेळेत रक्तदाता प्रेरक क्रिकेट टूर्नामेंट  भरवण्यात आली आहे. यात मुंबईतील १६ रूग्णालयांतील रक्त केंद्रांचे रक्तदाता संघ सहभागी होणार आहेत.
या क्रिकेट टूर्नामेंटच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत रक्तदानाचा संदेश पोहचविण्याचा  ब्लड डोनर मोटीव्हेशन कमिटी या संघटनेचा मानस आहे.
अधिक माहितीसाठी प्रकाश सावंत (समाज विकास अधिकारी के.ई.एम) 9869654784, 7977450213 यांच्याशी संपर्क साधावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed